गुलाल उधळायला बारामतीला जाणार

गुलाल उधळायला बारामतीला जाणार

मुंबई नगरी टीम

मुंबई : पश्चिम महाराष्ट्रातील १२ जागांवर युतीचे उमेदवार विजयी होणार असल्याने येत्या २३ मे रोजी बारामतीला जावून कांचनताई कुल यांच्या विजयी मिरवणूकीत गुलाल उधळणार असल्याचा दावा राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी आज केला.

लोकसभा निवडणूकीचा निकाल येत्या २३ मे रोजी जाहीर होणार असला तरी त्यापुर्वीच विजयाचे दावे करण्यास सुरूवात झाली आहे. पश्चिम महाराष्ट्रातील वजनदार मंत्री आणि राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पश्चिम महाराष्ट्रातील १२ च्या १२ जागांवर युतीचे उमेदवार विजयी होतील असा दावा आज केला आहे. एवढेच काय बारामती लोकसभा मतदार संघातून भाजपाच्या उमेदवार कांचनताई कुल या मोठ्या मतांच्या फरकाने विजयी होतील असेही चंद्रकांत पाटील म्हणाले. येत्या २३ मे रोजी निकालाच्या दिवशी कांचनताई कुल यांच्या विजयी मिरवणूकीत गुलाल उधळायला आणि पेढे वाटायला आपण बारामतीला जाणार असल्याचा दावाही चंद्रकांतदादांनी आज केला.

सुप्रिया सुळे या विजयाचा दावा करीत आहेत तर दुस-याच्या सुख:त सुख मानणारा मी असल्याने सुप्रियाताई विजयी झाल्यातर त्यांचे अभिनंदनही आपण करू असेही दादांनी स्पष्ट केले.

Previous articleयेत्या ७ जूनला विधानपरिषदेची पोटनिवडणूक
Next articleदुष्काळप्रश्नी शरद पवारांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट