जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांमधील रिक्तपदांच्या पोटनिवडणुकांसाठी २३ जूनला मतदान

जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांमधील रिक्तपदांच्या पोटनिवडणुकांसाठी २३ जूनला मतदान

मुंबई नगरी टीम

मुंबई:रायगड, पुणे, अहमदनगर, हिंगोली, वर्धा, भंडारा व गोंदिया या सात जिल्हा परिषदांमधील नऊ रिक्तपदांच्या पोटनिवडणुकीसाठी आणि विविध १६ पंचायत समित्यांमधील १६ रिक्तपदांच्या पोटनिवडणुकांकरिता २३ जून २०१९  मतदान; तर २४ जून २०१९ रोजी मतमोजणी होईल, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी आज येथे दिली.

सहारिया यांनी सांगितले की, या पोटनिवडणुकांसाठी नामनिर्देशनपत्रे ३ ते ८ जून २०१९ या कालावधीत स्वीकारली जातील. ५ जून २०१९ रोजी शासकीय सुट्टीमुळे नामनिर्देशनपत्रे स्वीकारण्यात येणार नाहीत. मतदान २३ जून २०१९ रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत होईल.पोटनिवडणूक होणाऱ्या जिल्हा परिषदनिहाय निवडणूक विभाग असे: रायगड- कळंब (ता. कर्जत), पुणे- बावडा-लाखेवाडी (इंदापूर),अहमदनगर- बारागाव नांदूर (राहुरी), हिंगोली- येहळेगाव तु. (कळमनुरी), वर्धा- झडशी (सेलू) व मांडगाव (समुद्रपूर), भंडारा- ब्रम्ही (पवनी) व पालांदपूर (लाखनी) आणि गोंदिया- आसोली (गोंदिया).

पोटनिवडणूक होणाऱ्या पंचायत समितीनिहाय निर्वाचक गण असे: पेण (जि. रायगड)- वडखळ, पालघर (पालघर)- खैरापाडा, हवेली (पुणे)- वाडेबोल्लाई, कागल (कोल्हापूर)- माद्याळ, देवळा (नाशिक)- महालपाटणे, चाळीसगाव (जळगाव)- मेहुणबारे, नेवासा (अहमदनगर)- सोनई, कर्जत (अहमदनगर)- कोरेगाव, केज (बीड)- आडस, बिलोली (नांदेड)- अटकळी, माहूर (नांदेड)- वाई बा, मुखेड (नांदेड)- जांब बु., औंढा ना. (हिंगोली)- असोला तर्फे लाख, गोरेगाव (गोंदिया)- घोटी, अर्जुनी मोरगाव (गोंदिया)- माहुरकुडा आणि हिंगणघाट (वर्धा)- वडनेर.

            निवडणूक कार्यक्रमाचा तपशील

  • नामनिर्देशनपत्रे सादर करणे-३ ते ८ जून
  • नामनिर्देशनपत्रांची छाननी-१० जून
  • अपील नसल्यास उमेदवारी मागे घेणे-१५ जून
  • अपील असल्यास उमेदवारी मागे घेणे-१९ जून
  • मतदानाचा दिनांक-२३ जून
  • मतमोजणीचा दिनांक-२४ जून

Previous article“थॅक्यू बाबा” म्हणत पंकजा मुंडे, खा. प्रीतम मुंडे लोकनेत्याच्या समाधीवर नतमस्तक 
Next articleआमदार उदय सामंत ठरले “किंगमेकर”