राहुल गांधींनी काँग्रेसच्या अध्यक्षपदी कायम रहावे

राहुल गांधींनी काँग्रेसच्या अध्यक्षपदी कायम रहावे

मुंबई नगरी टीम

मुंबई :  काँग्रेस अध्यक्ष  राहुल गांधी राजीनाम्याचा आग्रह न धरता काँग्रेस अध्यक्षपदी कायम रहावे असा विनंतीवजा प्रस्ताव महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी व मुंबई विभागीय काँग्रेस कमिटीने आज एकमताने मंजूर केला.

आज टिळक भवन दादर येथे काँग्रेस पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांची बैठक पार पडली या बैठकीत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी राजीनाम्याचा आग्रह न धरता काँग्रेस अध्यक्षपदी कायम रहावे असा प्रस्ताव महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी मांडला. मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष मिलिंद देवरा यांनी या प्रस्तावाला अनुमोदन दिले. उपस्थित सर्व नेत्यांनी या प्रस्तावाला पाठिंबा दिला व एकमताने हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला.

त्यानंतर आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीबाबत बैठकीत चर्चा करण्यात आली. येत्या आठवड्यात मा. प्रदेशाध्यक्ष विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी जिल्हानिहाय बैठका घेणार आहेत. सोशल इंजिनयरिंगच्या माध्यमातून सर्व समाजातील तरूणांना व नविन नेतृत्वाला संधी देण्याबाबत बैठकीत सकारात्मक चर्चा झाली तसेच नवनियुक्त खा. सुरेश उर्फ बाळू धानोरकर यांचे अभिनंदन करण्यात आले. या बैठकीपूर्वी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी काँग्रेस पक्षाच्या लोकसभा निवडणुकीतील उमेदवारांशी चर्चा केली व आढावा घेतला.

या बैठकीला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अशोक चव्हाण, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व राजस्थानचे प्रभारी अविनाश पांडे, माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार, काँग्रेस वर्किंग कमिटीचे सदस्य आ. बाळासाहेब थोरात, मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष मिलिंद देवरा, विधानपरिषदेचे माजी उपसभापती माणिकराव ठाकरे, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, आ. नसीम खान, जयवंत आवळे, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव व महाराष्ट्राचे सहप्रभारी सोनल पटेल, चेल्ला वामशी रेड्डी, बी. एम. संदीप, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव व गुजरातचे प्रभारी राजीव सातव, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव आ. वर्षा गायकवाड, आ. हर्षवर्धन सपकाळ, बाजीराव खाडे, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या अनुसूचित जाती विभागाचे अध्यक्ष डॉ. नितीन राऊत, माजी मंत्री आ. डी. पी. सावंत, माजी मंत्री कृपाशंकर सिंह, माजी मंत्री आ. बसवराज पाटील, खा. हुसेन दलवाई, खा. बाळू धानोरकर, आ. भाई जगताप माजी खा. एकनाथ गायकवाड, महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा चारुलता टोकस, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे, सेवादलाचे प्रदेशाध्यक्ष विलास औताडे,   आमिर शेख, प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस माजी आ. माणिकराव जगताप, अॅड. गणेश पाटील, पृथ्वीराज साठे, अभिजीत सपकाळ आदी उपस्थित होते.

Previous articleदिव्यांगांना शासकीय नोकरीत मिळणार ४ टक्के आरक्षण
Next articleराज्यातील सात जणांची मोदी मंत्रिमंडळात वर्णी