काँग्रेसला धक्का !  आमदार भाऊसाहेब कांबळे शिवसेनेत जाणार

काँग्रेसला धक्का !  आमदार भाऊसाहेब कांबळे शिवसेनेत जाणार

मुंबई नगरी टीम

मुंबई : श्रीरामपूरचे काँग्रेसचे आमदार भाऊसाहेब कांबळे यांनी काँग्रेस पक्षाला सोडचिट्ठी देण्याचा निर्णय घेतला असून, लवकरच ते  शिवसेनेत प्रवेश करणार असल्याने काँग्रेसला आणि  प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांना मोठा धक्का बसला आहे.

श्रीरामपूरचे काँग्रेसचे आमदार भाऊसाहेब कांबळे यांनी आमदारकीचा राजीनामा दिला आहे. त्यांनी आपला राजीनामा विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याकडे सुपूर्द केला आहे. त्यावेळी उद्योगमंत्री सुभाष देसाई आणि मिलिंद नार्वेकर उपस्थित होते.कांबळे यांनी राजीनामा दिल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख  उद्धव ठाकरे यांची  भेट घेवून चर्चा केली. कांबळे हे येत्या ४ सप्टेंबर रोजी हातात शिवबंधन बांधणार आहेत. कांबळे यांनी काँग्रेस पक्षाकडून शिर्डीतून लोकसभेची निवडणूक लढवली होती. त्यात त्याचा पराभव झाला होता. गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे यांचे कट्टर समर्थक असलेले कांबळे यांनी बाळासाहेब थोरात यांची साथ धरली होती. पण त्यांनी आज त्यांचीही  साथ सोडली. आगामी विधानसभा निवडणूकीत श्रीरामपूर मधून भाऊसाहेब कांबळे यांना शिवसेनेकडून उमेदवारी दिली जाणार आहे.

Previous articleमराठवाडा दुष्काळमुक्त करणारच
Next articleकडकनाथ फसवणूक प्रकरणाची सीआयडी मार्फत चौकशी