मुंबईत युतीचा बोलबाला ! राष्ट्रवादीने खाते खोलले
मुंबई नगरी टीम
मुंबई : मुंबईत अपेक्षेप्रमाणे शिवसेना भाजपाचे वर्चस्व असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. मुंबईतील एकूण ३६ जागांपैकी भाजपाला १७ तर शिवसेनेला १४ जागा मिळाल्या आहेत. गेल्या निवडणूकीत मुंबईतून काँग्रेसला ५ जागा मिळाल्या होत्या. या निवडणूकीत त्यांना १ जागा गमवावी लागली आहे तर यंदा मुंबईत अणुशक्तीनगर मधून राष्ट्रवादीचे उमेदवार नवाब मलिक यांचा विजय झाला आहे. या निवडणूकीत मुंबईमध्ये भाजपला २ जागांचा फायदा झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
२०१४ च्या विधानसभा निवडणूकीत भाजपाला १५ तर शिवसेनेला १४ जागांवर विजय मिळाला होता. काँग्रेसला ५ तर सपा आणि एमआयएमला प्रत्येकी १ जागा मिळाल्या होत्या.आज घोषित झालेल्या निकालावरून मुंबईत शिवसेना भाजपाचेच वर्चस्व असल्याचे स्पष्ट झाले आहे. मुंबईतील एकूण ३६ जागांपैकी भाजपा शिवसेनेला ३१ जागांवर विजय प्राप्त करण्यात यश मिळाले आहे. त्यामध्ये भाजपाला १७ तर शिवसेनेला १४ जागा मिळाल्या आहेत.यंदाच्या निवडणूकीत भाजपाला २ जागांचा फायदा झाला आहे. काँग्रेसला ४ तर राष्ट्रवादीला १ आणि समाजवादी पक्षाला १ जागा मिळाली आहे.
मुंबईतील विजयी झालेले शिवसेना उमेदवार – आदित्य ठाकरे (वरळी ),सदा सरवणकर (माहिम),अजय चौधरी (शिवडी), मंगेश कुडाळकर (कुर्ला ), सुनील राऊत (विक्रोळी ), सुनील प्रभू (दिंडोशी) प्रकाश सुर्वे (मागाठाणे),रमेश कोरगावकर (भाडूप पश्चिम),रविंद्र वायकर (जोगेश्वरी पूर्व ),रमेश लटके (अंधेरी पूर्व ),प्रकाश फातर्पेकर (चेंबूर),संजय पोतनीस (कलिना), यामिनी जाधव (भायखळा),दिलीप लांडे (चांदिवली).
विजयी भाजपा उमेदवार- सुनील राणे (बोरीवली),पराग शाह (घाटकोपर पूर्व ),भारती लव्हेकर (वर्सोवा),मनिषा चौधरी (दहिसर), मिहीर कोटेचा (मुलुंड),अतुल भातखळकर (कांदिवली पूर्व ),योगेश सागर (चारकोप), विद्या ठाकूर (गोरेगाव),अमित साटम(अंधेरी पश्चिम ),पराग अळवणी (विलेपार्ले),राम कदम (घाटकोपर पश्चिम ),आशिष शेलार (वांद्रे पश्चिम ), कॅप्टन तमिळ सेलवन (सायन कोळीवाडा ),कालिदास कोळंबकर (वडाळा),मंगलप्रभात लोढा (मलबार हिल ), राहुल नार्वेकर (कुलाबा).
काँग्रेस-राष्ट्रवादीचे विजयी उमेदवार – अमीन पटेल (काँग्रेस- मुंबादेवी),वर्षा गायकवाड (काँग्रेस- धारावी) झिशान सिद्दीकी (काँग्रेस- वांद्रे पूर्व), अस्लम शेख ( मालाड पश्चिम) नवाब मलिका (राष्ट्रवादी काँग्रेस- अणूशक्तीनगर),अबू आझमी (समाजवादी पार्टी- मानखुर्द).चांदवलीतून काँग्रेसचे उमेदवार नसिम खान यांचा पराभव झाला आहे.मुंबईत एकमेव जागा असलेल्या एमआय़एमचे उमेदवार वारिस पठाण यांचा भायखळामधून पराभव झाला आहे.