शिवसेना राष्ट्रवादीचा अडीच-अडीच वर्ष मुख्यमंत्री

शिवसेना राष्ट्रवादीचा अडीच-अडीच वर्ष मुख्यमंत्री

मुंबई नगरी टीम

मुंबई : मुदतीत १४५ सदस्यांच्या पाठिंब्याचे पत्र सादर करण्यास शिवसेनेला अपयश आल्यानंतर आज राज्यात राजकीय घडामोडींना मोठा वेग आला आहे. राज्यात शिवसेना राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे सरकार स्थापन झाल्यास राष्ट्रवादीने शिवसेनेसमोर अडीच-अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद वाटून घेण्याचा प्रस्ताव ठेवल्याचे समजते.तर काँग्रेसने बाहेरुन पाठिंबा न देता  सत्तेत सहभागी होण्यासाठी राष्ट्रवादीने आवाहन करून त्यांना उपमुख्यमंत्रीपद देण्याचा प्रस्ताव दिल्याचे सूत्रांनी सांगितले.

शिवसेनेला राज्यपालांनी सरकार स्थापनेची विचारणा केल्यानंतर मुदतीत दोन्ही काँग्रेसने पाठिंब्याचे पत्र न दिल्याने शिवसेनेला सरकार स्थापन करण्यात अपयश आल्यानंतर आज राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे आपल्या प्रमुख नेत्यांची बैठक घेतली.त्यानंतर दिल्लीतून आलेले काँग्रेसचे नेते अहमद पटेल, महाराष्ट्राचे प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे,के.सी. वेणुगोपाल यांनी शरद पवार यांच्यासोबत चर्चा केली.त्याच दरम्यान शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मालाडच्या रिट्रीट हॅाटेल मध्ये जावून शिवसेना आमदारांशी चर्चा केली.राज्यात शिवसेना,राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे सरकार स्थापन झाल्यास राज्यात सत्ता वाटपात अडीच-अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद वाटून घेण्याचा प्रस्ताव राष्ट्रवादीने शिवसेनेपुढे ठेवला आहे. तर काँग्रेसने बाहेरुन पाठिंबा न देता  सत्तेत सहभागी होण्यासाठी राष्ट्रवादीने आवाहन करून त्यांना उपमुख्यमंत्रीपद देण्याचा प्रस्ताव दिल्याचे सूत्रांनी सांगितले.रिट्रीट हॅाटेल मध्ये शिवसेना आमदारांशी चर्चा करण्यापूर्वी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काही वेळ बाजूला जावून महत्वाच्या नेत्यांशी चर्चा केली मात्र त्यांनी कोणत्या नेत्यांशी चर्चा केली याची माहिती मिळू शकली नसली तरी त्यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याशी चर्चा केल्याचे समजते.

Previous articleअखेर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू
Next articleराज्यात राष्ट्रपती राजवट लागणे हे दुर्दैवी : देवेंद्र फडणवीस