आम्ही सरकार स्थापन करण्यास तयार होतो मात्र शिवसेनेनी साथ सोडली

आम्ही सरकार स्थापन करण्यास तयार होतो मात्र शिवसेनेनी साथ सोडली

मुंबई नगरी टीम

मुंबई : राज्यातील विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात भाजप शिवसेनेत सुरू असलेल्या वादानंतर राज्यातील सत्तापेचावर केंद्रिय गृहमंत्री अमित शाह शिवसेना भाजपातील वादावर भूमिका मांडली आहे.निवडणुक प्रचाराच्या दरम्यान मी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुढचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच असतील अशी घोषणा केली. त्यावेळी कोणीही यावर आक्षेप घेतला नाही.मात्र निवडणूक निकाल लागल्यानंतर शिवसेनेने अटी बदलल्या, आम्ही शिवसेनेचा कोणताही विश्वासघात केलेला नाही तर शिवसेनेने आमची साथ सोडली असे केंद्रिय गृहमंत्री अमित शहा यांनी सांगितले.

राज्यातील विधानसभा निवडणुकीनंतर भाजप आणि शिवसेनेत मुख्यमंत्रीपदावरून वादावादी होवून शिवसेनेने भाजपाची साथ सोडून अन्य पर्याय शोधण्यास सुरूवात केल्यानंतर भाजपाचे केंद्रिय नेतृत्वाने याबाबत कोणतीही भूमिका मांडली नाही किंवा हस्तक्षेपही केला नाही. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाबाबत अमित शहा यांनी शब्द देवूनही पाळला नसल्याची टिका केली होती.तर हा दावाही मुख्यमंत्र्यांनी खोडून काढला होता.त्यानंतर शिवसेना आणि भाजपातील नेते एकमेकांवर आरोपप्रत्यारोप करीत असताना दिल्लीतील भाजपाच्या नेत्यांनी यावर कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त केली नव्हती मात्र याबाबत आज खुद्द केंद्रिय गृहमंत्री अमित शहा यांनी आपली भूमिका मांडली एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी याबाबत शिवसनेनेला जबाबदार धरले.निवडणुकीत प्रचार सभांमध्ये मी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींनी महायुतीचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच होतील असे सांगितले. त्यावेळी यावर कोणीही आक्षेप घेतला नाही. मात्र निवडणूक निकालानंतर शिवसेनेने नव्या मागण्या करण्यास सुरूवात केली असा आरोप अमित शाह यांनी केला. शिवसेनेला मुख्यमंत्रीपद देण्याबाबत काहीही ठरलेले नव्हते असेही अमित शाह यांनी स्पष्ट करतानाच बंद दाराआड शिवसेनेसोबत काय चर्चा झाली ते सांगणे योग्य वाटत नाही.माझ्या पक्षाचा माझ्यावर तसा संस्कार नाही असे सांगून त्यांनी शिवसेना आणि भाजपात नेमक काय ठरलं हे सांगणे टाळले.

भाजपाने शिवसेनेचा कोणताही विश्वासघात केलेला नाही तर शिवसेनेने आमची साथ सोडली असा आरोपही त्यांनी केला.महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू केल्यानंतर यावर विरोधक टीका करत आहेत की आम्हाला पुरेसा वेळ दिला नाही याबाबत बोलताना शहा म्हणाले की, याला काहीही अर्थ नाही विरोधक केवळ राजकारण करत आहेत. वेळ दिला नाही,संधी दिली नाही हे सत्य नाही.राज्यपालांनी राष्ट्रपती राजवट लागू करुन सहा महिन्यांचा अवधी दिला आहे. ज्या पक्षाकडे बहुमत आहे त्यांनी सरकार स्थापन करावे असाही टोला शाह यांनी लगावला.राज्यातील सध्याच्या परिस्थितीनंतर राज्यपालांनी राष्ट्रपती राजवट लागू केली नसती तर भाजपाला काळजीवाहू सरकार चालवयाचे आहे असा आरोप केला असता.सर्वच पक्षांना संधी देवूनही एकाही पक्षाने सत्ता स्थापनेचा दावा करू शकला नाही.यामध्ये राज्यपालांचे काहीच चुकले नाही  असेही शाह यांनी स्पष्ट केले.

Previous articleमंत्र्यांच्या दालनात आवराआवर सुरू
Next articleशरद पवार म्हणाले …अजितदादा मुंबईतच