नव्या सरकारमध्ये यांना मंत्री म्हणून मिळू शकते संधी !
मुंबई नगरी टीम
मुंबई: राज्यातील सत्ता स्थापनेचा पेच सुटून महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होण्याचा मार्ग सुकर झाला आहे. किमान समान कार्यक्रमावर दोन्ही काँग्रेसने एकमत होवून, सत्तास्थापनेचा फॉर्म्युलाही ठरल्याची चर्चा आहे. नव्या महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये शिवसेनेला १५, राष्ट्रवादीला १५ आणि काँग्रेसला १२ मंत्रिपदे मिळणार असल्याचे समजते. शिवसेनेसोबत सरकार स्थापन करताना सरकारमधिल तिन्ही पक्षांचे सत्ता वाटप अंतिम करण्याबरोबरच संभाव्य मंत्र्यांच्या याद्याही तयार करण्यात आल्याची चर्चा आहे.शिवसेनेचा मुख्यमंत्री होणार असला तरी मुख्यमंत्रीपदाचे वाटप अडीच अडीच वर्षे वाटून घ्यावे अशी मागणी राष्ट्रवादीने केल्याचे समजते तर तिन्ही पक्षांचे सरकार चालविण्यासाठी संभाव्य मंत्रिमंडळात काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेने अनुभवी नेत्यांना स्थान देण्याचे ठरविले असल्याचे सांगण्यात येते.
त्यानुसार पुढील प्रमाणे तिन्ही पक्षांच्या या नेत्यांचा मंत्रिमंडळात समावेश केला जावू शकतो.
शिवसेनेच्या संभाव्य मंत्र्यांची नावे-
एकनाथ शिंदे,सुनिल प्रभु,अनिल परब,उदय सामंत,दिपक केसरकर,तानाजी सावंत,गुलाबराव पाटील,संजय राठोड,रविंद्र वायकर,प्रताप सरनाईक,भरत गोगावले,प्रकाश आबिटकर,अनिल बाबर,अब्दुल सत्तार,निलम गो-हे
चर्चेत असलेल्या राष्ट्रवादीच्या संभाव्य मंत्र्यांची नावे-
जयंत पाटील,अजित पवार,छगन भुजबळ,नवाब मलिक,हसन मुश्रीफ,अनिल देशमुख,धनंजय मुंडे,दिलीप वळसे पाटील,मकरंद पाटील,राजेश टोपे,भारत भालके,धर्मरावबाबा आत्राम, राजेश पाटील, चेतन तुपे, जितेंद्र आव्हाड, आदिती तटकरे.
काँग्रेसच्या संभाव्य मंत्र्यांची नावे-
अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवार,के.सी.पाडवी,विश्वजीत कदम,यशोमती ठाकूर,वर्षा गायकवाड,सतेज पाटील,सुनिल केदार,नितीन राऊत,कुणालबाबा पाटील,शिरिष चौधरी,अमित झनक,सुलभा खोडके.