भाजपाला धक्का ; अजित पवारांचा राजीनामा
मुंबई नगरी टीम
मुंबई : बहुमत सिद्ध करण्यापूर्वी भाजपाला मोठा धक्का बसला आहे.अजित पवार यांनी आज उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे.काही वेळानंतर ते पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडणार आहेत.
राष्ट्रवादीशी बंडखोरी करून भाजपाला साथ देत उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणारे अजित पवार यांनी काही वेळापूर्वी आपला राजीनामा दिला आहे. त्यामुळे बहुमत सिद्ध करण्यापूर्वीच भाजपाला मोठा धक्का बसला आहे. गेल्या दोन दिवसांपासून अजित पवार यांच्या मनधरणीचे प्रयत्न सुरु होते. शनिवारी २३ नोव्हेंबर रोजी अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची तर देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यानंतर राष्ट्रवादीचे अनेक दिग्गज नेते हे अजित पवारांच्या भेटीला गेले होते.तर त्यांनी पक्षात परत यावे यासाठी शरद पवार यांच्यासह खा. सुप्रिया सुळे यांनीही प्रयत्न केले होते.