- मेष:-
महिलांनी आरोग्याची काळजी घ्यावी. लिखाण जपून करावे. शिस्तीचे धोरण ठेवाल. प्रवासात काळजी घ्यावी. बोलण्यातून चांगली छाप पडाल. - वृषभ:-
जोडीदाराचे मत मान्य करावे लागेल. पारंपरिक व्यवसायात लक्ष घालावे. मानसिक व्यग्रता जाणवेल. सर्वांशी सहृदयतेने वागाल. भागीदाराशी सलोखा ठेवावा. - मिथुन:-
जोडीदाराची प्रगती होईल. भागीदाराचा विश्वास संपादन करावा. पोटाची काळजी घ्यावी. गैरसमजाला खतपाणी घालू नका. कामात चालढकल करू नका. - कर्क:-
मनाची शांतता जपावी. मुलांच्या कारवाया वाढतील. कामातून समाधान शोधाल. जोडीदाराचा प्रेमळ सहवास लाभेल. नातेवाईकांशी संबंध सुधारावेत. - सिंह:-
कौटुंबिक प्रश्नांकडे लक्ष द्यावे. घरातील ज्येष्ठांची काळजी घ्यावी. उत्तम वाहन सौख्य लाभेल. जमिनीच्या कामात यश येईल. मुलांच्या समस्या सोडवाव्यात. - कन्या:-
प्रवासात सावध राहावे. घरात नातेवाईक गोळा होतील. कौटुंबिक खर्चाचा पुनर्विचार करावा. बागकामात वेळ घालवाल. मुलांच्या तब्बेतीची काळजी घ्यावी. - तूळ:-
गायन कला जोपासावी. जवळचा प्रवास मजेत होईल. काही नवीन शिकण्याची संधी मिळेल. नातेवाईकांना मदत कराल. अतिअपेक्षा बाळगू नका. - वृश्चिक:-
तुमच्या अहंमन्यतेत वाढ होऊ शकते. कामातील चिकाटी वाढेल. दृढनिश्चय करून पुढे पाऊल टाकावे. व्यावसायिक लाभावर लक्ष लागून राहील. डोकेदुखीचा त्रास जाणवेल. - धनु:-
इतरांवर आपला प्रभाव पडण्याचा प्रयत्न करावा. शांत व विचारी भूमिका घ्याल. कामाची दगदग वाढेल. मानसिक स्थिरता जपावी. जोडदाराच्या प्रकृतीची काळजी घ्यावी. - मकर:-
झोपेची तक्रार दूर करावी. नामस्मरणात वेळ व्यतीत करावा. चित्त एकाग्र करण्याचा प्रयत्न करावा. घाईने कोणतेही निर्णय घेऊ नका. दिवस मनाप्रमाणे घालवाल. - कुंभ:-
मौल्यवान वस्तू खरेदी कराल. हातात नवीन अधिकार येतील. अपेक्षित अर्थप्राप्ती होईल. कौटुंबिक सौख्यात वाढ होईल. बढतीसाठी प्रयत्न करावेत. - मीन:-
कामाचे कौतुक केले जाईल. अधिकाऱ्यांची गाठ घ्यावी लागेल. तब्बेतीबाबत हयगय करू नये. फार विचार करत बसू नका. प्रवासात काळजी घ्यावी.– ज्योतिषी विद्याधर करंदीकर
© Mumbai Nagri Designed by
Tushar Bhambare +91 9579794143