मुंबई नगरी टीम
मुंबई : राज्य सरकारने आज पाच सनदी अधिका-यांच्या बदल्या केल्या आहेत.महाराष्ट्र राज्य विद्युत कंपनी कल्याणचे सहव्यवस्थापकीय संचालक आर. बी. भोसले यांची पुण्याचे अतिरिक्त विभागीय आयुक्तपदी नियुक्ती केली आहे.
राज्य सरकारने काल नऊ सनदी अधिका-यांच्या बदल्या केल्यानंतर आज पाच सनदी अधिका-यांच्या बदल्या केल्या आहेत.ए.के. डोंगरे यांची श्री.साईबाबा विश्वस्त व्यवस्था शिर्डी येथे मुख्य कार्यकारी अधिकारी या पदावर नियुक्ती केली आहे.तर अभिजीत बांगर यांची नियुक्ती संचालक वस्त्रोद्योग नागपूर या रिक्त पदावर केली आहे.वाशिम जिल्हा परिषदेच्या अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांची बदली नाशिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य विद्युत कंपनी कल्याणचे सहव्यवस्थापकीय संचालक आर. बी. भोसले यांची पुण्याचे अतिरिक्त विभागीय आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे.जी.एम.बोडके यांची नियुक्ती महाराष्ट्र राज्य विद्युत कंपनी कल्याणचे सहव्यवस्थापकीय संचालकपदी करण्यात आली आहे.