शेतकरी कर्जमाफीसाठी १५ हजार कोटींची तरतूद

मुंबई नगरी टीम
मुंबई : आजपासून सुरू झालेल्या राज्य विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या आजच्या पहिल्याच दिवशी राज्य सरकारने तब्बल २४ हजार ७२३ कोटींच्या पुरवणी खर्चाच्या मागण्या सभागृहात मंजूरीसाठी सादर केल्या असून,त्यामध्ये महात्मा जोतिबा फुले शेतकरी कर्जमाफी योजनेसाठी १५ हजार कोटींची मागणी करण्यात आली आहे.या योजनेसाठी यापूर्वीच्या अधिवेशनात १० हजार कोटींची तरतूद करण्यात आली होती.

राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राज्यातील महाराष्ट्र विकास आघाडीच्या सरकारने विरोधकांच्या गदारोळातच एकूण २४ हजार ७२३ कोटींच्या पुरवणी मागण्या सभागृहात सादर केल्या आहेत. विशेष म्हणचे त्यामध्ये महात्मा जोतिबा फुले शेतकरी कर्जमाफी योजनेसाठी १५ हजार कोटींची मागणी करण्यात आली आहे.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नागपुर अधिवेशनात शेतकरी कर्जमाफीची घोषणा केली होती. या योजनेसाठी १० हजार कोटींची तरतूद करण्यात आली होती.आजच्या पुरवण्या मागणीमध्ये १५ हजार कोटींची तरतूद केल्याने सरकारने एकूण २५ हजार कोटींची तरतूद ही शेतकरी कर्जमाफीसाठी केल्याचे स्पष्ट झाले आहे.

Previous articleविधानपरिषदेत विरोधकांची मुस्कटदाबी करण्याचा प्रयत्न
Next articleमहाविकास आघाडीचे सरकार पाच वर्षे टिकणार