उदयनराजे भोसले आणि रामदास आठवलेंना राज्यसभेची उमेदवारी

मुंबई नगरी टीम
मुंबई : राज्यातील राज्यसभेच्या ७ जागांसाठी येत्या २६ मार्च रोजी निवडणुक होणार असून,राज्यसभेच्या निवडणुकीसाठी भाजपने आज राज्यातील दोन उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे.साता-याचे माजी खासदार उदयनराजे भोसले आणि आरपीआयचे अध्यक्ष रामदास आठवले यांना भाजपाने उमेदवारी जाहीर केली आहे.मात्र भाजपने तिस-या उमेदवाराच्या नावाची घोषणा केली नाही.

राज्यातील राज्यसभेच्या ७ जागांसाठी येत्या २६ मार्च रोजी निवडणुक होत आहे. भाजपच्या केंद्रीय निवडणुक समितीने राज्यसभा निवडणुकीसाठी उमेदवारांच्या नावांवर शिक्का मोर्तब केल्यानंतर राष्ट्रीय महासचिव अरूण सिंह यांनी उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे.त्यानुसार महाराष्ट्रातुन साता-याचे माजी खासदार उदयनराजे भोसले आणि आरपीआयचे अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.मतांचे बलाबल पाहता भाजपाचे तीन उमेदवार सहज निवडुन येवू शकतात मात्र आज भाजपाने तिस-या उमेदवाराच्या नावाची घोषणा केलेली नाही.तिस-या जागेसाठी माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या नावाची चर्चा होती.विशेष म्हणजे मध्य प्रदेश मध्ये कॅांग्रेसला हादरा दिलेले जोतिरादित्य शिंदे यांना मध्य प्रदेशमधून राज्यसभेची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.उमेदवारी अर्ज दाखल करण्याची १३ मार्च ( शुक्रवार) ही अंतिम मुदत आहे.

Previous articleवरळीतील पर्यटन केंद्र कुणाचे चोचले पुरविण्यासाठी ? : प्रविण दरेकर
Next articleराज्यात करोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता १० वर