कोरोना इफेफ्ट : ११ हजार कैद्यांना तुरूंगातून सोडणार

मुंबई नगरी टीम

मुंबई : कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी सोशल डिस्टंसिंग विचार करून राज्यातील विविध तुरूंगात असणा-या ११ हजार कैद्यांना पॅरोलवर सोडण्याचा महत्वपूर्ण निर्णय गृहखात्याने घेतला आहे.

राज्यातील विविध तुरूंगात सध्या मोठ्या संख्येने गुन्हेगार आहेत. सध्या देशात आणि राज्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भात मोठ्या प्रमामात वाढत असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून सोशल डिस्टंसिंग विचार करून राज्यातील ११ हजार कैद्यांना तातडीने पॅरोलवर सोडण्याचे आदेश गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिले आहेत. ७ वर्ष किंवा त्याहून कमी शिक्षेस पात्र असलेल्या राज्यातील ६० तुरूंगांतील जवळपास ११ हजार आरोपी, गुन्हेगारांना तातडीने  पॅरोल देण्याचे आदेश गृहमंत्र्यांनी दिले आहेत.पुढील आठवड्याभरात यावर कारवाई व्हावी अशाही सूचना दिल्या  आहेत. अशी माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी व्टिटरद्वारे दिली आहे.

Previous articleसरकारचा मोठा निर्णय; आता  दुकाने २४ तास उघडी ठेवणार
Next articleराष्ट्रवादी काँग्रेसचा निर्णय : आमदारांचे एका महिन्याचे वेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधीला