मुंबई नगरी टीम
मुंबई : महाराष्ट्रात तीन पक्षांचे सरकार स्थापन करतानाच राजकीय सामना करीत कोरोना संकटाचा धैर्याने मुकाबला करणारे राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना देशातील सर्वाधिक लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या यादीत मानाचे स्थान मिळाले आहे.देशभरातील विविध राज्यांमधील नेते आणि राष्ट्रीय नेत्यांची लोकप्रियता जाणून घेण्यासाठी आयएएनएस आणि सी व्होटर्स या संस्थेने केलेल्या सर्वेक्षणात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची लोकप्रियता ७६.५२ टक्के असल्याचे स्पष्ट झाले आहे.विशेष म्हणजे सर्वात कमी लोकप्रियता असणाऱ्या मुख्यमंत्र्यांमध्ये तीन मुख्यमंत्री हे भाजपाशासित राज्यातील आहेत.
काँग्रेस,राष्ट्रवादी सोबत आघाडी करून सहा महिन्याचा कालावधी पूर्ण होत असतानाच राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सरकार अस्थिर होत असल्याचे चित्र राज्यात होते.त्यांच्या विधान परिषद सदस्यत्वावरून बरेच राजकारण गाजले असतानाच राज्यात कोरोनाच्या संकटाने विळखा घट्ट केल्याने ठाकरे यांना विरोधी पक्षासोबत चार हात करतानाच धैर्याने कोरोनाचा मुकाबला करताना देशातील आणि राज्यातील जनतेने पाहिले आहे.कोरोनाच्या संकटात जनतेला धीर देताना जनतेशी फेसबुक लाईव्हद्वारे संवाद साधताना त्यांचा संयमी स्वभाव सर्वांना भावला आहे.त्यांच्या या कामाची पावती देशातील जनतेने दिली आहे.देशभरातील विविध राज्यांमधील नेते आणि राष्ट्रीय नेत्यांची लोकप्रियता जाणून घेण्यासाठी आयएएनएस आणि सी व्होटर्स या संस्थेने केलेल्या सर्वेक्षणात उद्धव ठाकरे यांना देशातील सर्वात लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या यादीत मानाचे स्थान मिळाले आहे.या अहवालातील आकडेवारीनुसार राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची लोकप्रियता ७६.५२ टक्के असल्याचे म्हटले आहे.
या संस्थेने देशभारातील वेगवेगळ्या राज्यांमधील जनतेकडून राष्ट्रीय तसेच राज्य स्तरावरील नेत्यांच्या लोकप्रियतेबद्दल जाणून घेण्यासाठी एक सर्वेक्षण केले आहे. यात राष्ट्रीय स्तरावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ६६.२० टक्के लोकांनी पसंती दर्शवली तर २३.२१ टक्के लोकांनी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना पसंती दिली आहे.या सर्वेक्षणात विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची लोकप्रियता जाणून घेण्यात आली.ओदिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक हे सर्वात लोकप्रिय मुख्यमंत्री ठरले आहेत. ८२.९६ टक्के लोकांनी त्यांना पसंती दिली आहे.छत्तीसगडमधील काँग्रेसचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांना ८१.०६ जनतेने पसंती देत दुसरे स्थान दिले आहे.तिसऱ्या स्थानावर केरळचे मुख्यमंत्री पिनारायी विजयन यांचा समावेश असून त्यांना ८०.२८ टक्के लोकांना पसंती दिली आहे. चौथ्या स्थानावर आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी हे आहेत त्यांना ७८.५२ टक्के जनतेनी पसंती दिली आहे.पाचव्या स्थानावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आहेत.त्यांना ७६.५२ टक्के जनतेने पसंती दिली आहे. विशेष तर सहाव्या क्रमांकावर दिल्लीचे मुख्यमंत्री अऱविंद केजरीवाल यांचे नाव असून त्यांना ७४ टक्के लोकांना पसंती दिली आहे. विशेष म्हणजे सर्वाधिक पसंती असणाऱ्या सर्वात कमी लोकप्रियता असलेल्या मुख्यमंत्र्यांमध्ये हरणायाचे मनोहर लाल खट्टर (४.४७ टक्के मते), उत्तराखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंग रावत (१७.७२) आणि गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत (४२.७९) या तीन भाजपाची सत्ता असणाऱ्या राज्यांमधील मुख्यमंत्र्यांचा समावेश आहे.सर्वात कमी लोकप्रियता असलेल्या पाच मुख्यमंत्र्यांच्या यादीत जनता दल युनायटेडचे नेते आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार (३०.८२) आणि काँग्रेसची सत्ता असणाऱ्या पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग (२७.५१) यांचा समावेश आहे.विशेष म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या यादीत पहिल्या सहामध्ये केंद्रात सत्ता असणाऱ्या भाजपाच्या एकाही मुख्यमंत्र्याचा समावेश नाही.