मी कालही विद्यार्थ्यांसोबत होतो आजही आहे आणि उद्याही राहणार !

मुंबई नगरी टीम

मुंबई : महाविद्यालय आणि विद्यापीठांच्या अंतिम परीक्षा रद्द करण्यावर राज्य सरकार ठाम आहे.तर कुलगुरूंनी अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्याची आवश्यकता नसल्याचा दावा राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी करीत या निर्णयावर ठाम असल्याचे स्पष्ट केल्यानंतर भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना पत्र लिहून सामंत यांना तत्काळ पदावरून दूर करण्याची मागणी केली आहे.यावर उदय सामंत यांनी ट्विट करीत भातखळकर यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

राज्यातील सध्याची कोरोनाची परिस्थिती पाहता विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा विचार करून परीक्षा रद्द करण्याच्या निर्णयावर ठाम असल्याचे राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी स्पष्ट केले आहे.राज्यातील अंतिम वर्षाच्या परीक्षांवरून राज्य सरकार आणि विरोधी पक्ष भाजप आमनेसामने आहे. त्यामध्येच भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना पत्र लिहून सामंत यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.राज्यातील सर्व कुलगुरूंनी अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्याची आवश्यकता नसल्याचा दावा सामंत यांनी काही दिवसांपूर्वी केला होता.मात्र नागपूर,अमरावती गोंडवाना विद्यापीठांच्या कुलगुरूंनी असे कोणतेही निवेदन दिले नसल्याचे स्पष्ट केले असल्याचे आ.भातखळकर यांनी सांगून,सामंत यांना तत्काळ पदावरून दूर करण्याची मागणी राज्यपालांकडे केली आहे.भातखळकर यांच्या या पत्रा नंतर मंत्री सामंत यांनी ट्विट करून भातखळकर यांना आव्हान दिले आहे.अशी कितीही पत्र द्या माझ्या भूमिकेत बदल होणार नाही !.. कालही विद्यार्थ्यांसोबत होतो, आजही आहे आणि उद्याही राहणार.. अतुलजींना शुभेच्छा, अशा शब्दात सामंत यांनी भातखळकर यांचा समाचार घेतला आहे.

Previous articleशिक्षकांच्या ऑफलाईन बदल्यांना पंकजा मुंडेंचा विरोध
Next articleशेतकऱ्यांचा नेता म्हणवून घेणारे आमदारकी मिळणार असे समजताच शांत !