मुंबई नगरी टीम
मुंबई : महाविकास आघाडीचे सरकार असल्यामुळे दिवसेंदिवस शिवसेनेची संघटनात्मक ताकद कमी होत असल्याची जाणीव बहुदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना झाली असावी. शेवटी राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसचे आमदार ज्या ठिकाणी असतील त्या ठिकाणी शिवसेनचं नेतृत्व काय काम करणार, त्यांनी कश्यासाठी व कोणासाठी काम करायचं.जिल्हा परिषद, पंचायत समितींमध्ये राष्ट्रवादी किंवा काँग्रेसचे पदाधिकारी असतील तर तेथील शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी काय करावं असा प्रश्न निर्माण होऊ शकतो आणि त्यामुळे काम कोणासाठी आणि कश्यासाठी करावं असा प्रश्न शिवसैनिकांना पडू शकतो.त्यामुळे शिवसैनिकांचा आत्मविश्वास जागवण्यासाठी आपण आता शंभर टक्के निवडणूक एकहाती लढवणार आहोत शिवसैनिकानाही न्याय मिळेल याच भावनेने उद्धव ठाकरे यांनी शतप्रतिशत एकहाती भगवा फडकवण्याचा विश्वास शिवसैनिकांना व जिल्हाप्रमुखाना देण्याचा प्रयत्न केला आहे असल्याचे विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी म्हटले आहे.
महाविकास आघाडी सरकारमध्ये राहून पक्षाची ताकद कमी झाली तरी चालेल कि एकवेळा सत्ता नसेल तरी चालेल परंतु पक्ष संघटना महत्वाची असा प्रश्न सध्या शिवसेनेला पडला आहे. यामुळे सध्या द्विधा मनस्थितीत नेतृत्व आल्यानं आता पक्ष कि सरकार या भावनेने एकहाती भगवा फडकावण्याचं वक्तव्य मुख्यमंत्री ठाकरे यांना करावं लागले आहे असेही दरेकर यांनी म्हटले आहे.
दरम्यान नॅशनल हेल्थ मिशनच्या माध्यमातून करावयाच्या कायमस्वरूपी नियुक्तीमध्ये ४०० कोटीचा घोटाळा झाला असल्याचे पत्र विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमत्र्यांकडे दिल्याचे समजत.हा अत्यंत भयंकर प्रकार आहे. एक ते दीड लाख रुपये प्रत्येक उमेदवाराकडून कडून घेण्यात आले.पाचशेच्या नोटा हवेत अश्या ऑडियो क्लिप सुद्धा पुरावादाखल त्याठिकाणी दिलेत. अत्यंत गंभीर स्वरूपाचा हा घोटाळा आहे. केंद्र सरकार यासाठी पैसे देत असते व याची अंमलबजावणी राज्य सरकार करत असते. वीस हजार नियुक्तत्यांच्या माध्यमातून असे पैसे घेतले असतील तर हे अतिशय गंभीर आहे आणि या घोटाळ्याची तात्काळ चौकशी करावी राज्य सरकारने करावी.यामध्ये बोलवता धनी कोण आहे व यामागचा सूत्रधार कोण आहे हे राज्यातील जनतेसमोर आणून त्याच्यावर कारवाई केली पाहिजे अशी मागणी दरेकर यांनी केली.