मुंबई नगरी टीम
मुंबई : दिल्ली,राजस्थान, गुजरात आणि गोवा या राज्यातील वाढत्या कोरोना रुग्ण संख्येच्या पार्श्वभूमावर राज्य सरकारने या चार राज्यातून महाराष्ट्रात येणा-या नागरिकांना कोरोनाची चाचणी सक्तीची केली आहे.राज्य सरकारने आज यासंदर्भातील नियमावली जाहीर केली आहे,
राज्यात कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता असल्याच्या पार्श्वभूमीवर दिल्ली,राजस्थान,गुजरात आणि गोवा राज्यात कोरोना रूग्णांची वाढती रूग्णांची संख्या लक्षात घेवून खबरदारीचा उपाय म्हणून या चार राज्यातून महाराष्ट्रात येणा-या नागरिकांना कोरोनाची चाचणी बंधनकारक करण्यात आली आहे.देशाची राजधानी दिल्लीत करोनाची तिसरी लाट आली असून,त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहेत.त्याच प्रमाणे गुजरात,गोवा आणि राजस्थान या राज्यातही रूग्णांची संख्या झपाट्याने वाढताना दिसत असल्याने या राज्यातील नागरिकांना महाराष्ट्रात येण्यासाठी आता कोरोनाची चाचणी सक्तीची करण्यात आली आहे.या चार राज्यातून येणाऱ्या हवाई प्रवाशांना महाराष्ट्रातील विमानतळावर उतरल्यानंतर आरटीपीसी अहवाल सादर करावा लागणार आहे.
दिल्ली,राजस्थान,गुजरात आणि गोवा या चार राज्यातून रेल्वेने महाराष्ट्रात येणाऱ्या प्रवाशांनाही कोरोना चाचणीचा अहवाल सादर करावा लागणार आहे.अशा प्रवाशांना ९६ तास आधी कोरोना चाचणी करावी लागणार आहे. रस्ते मार्गाने येणाऱ्या प्रवाशांची चेकपोस्टवर तपासणी केली जाणार असून, ज्या प्रवाशांमध्ये कोरोनाची लक्षणे दिसतील, त्यांची अँटीजेन चाचणी केली जाईल.या मध्ये प्रवासी पॉझिटिव्ह आढळला तर अशा प्रवाशाला कोविड सेंटरमध्ये दाखल केले जाणार आहे. या चार राज्यातून येणा-या प्रवाशांसाठी राज्य सरकारुने आज नियमावली जाहीर करण्यात आली आहे.दिवाळीनंतर राज्यातील कोरोना रूग्णांची संख्या वाढण्याची शक्यता गृहीत धरून खबरदारीचा उपाय म्हणून राज्य सरकारने हे पाऊल उचलले आहे.