महादेव शेलार यांनी गळफास घेऊन आत्महत्या
मुंबई दि.14 महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस आणि प्रवक्ते अॅड. महादेव शेलार यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. महादेव शेलार यांनी राहत्या घरी आत्महत्या केली. शेलार यांच्या आत्महत्येचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. पण आजाराला कंटाळून आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविला जातो आहे. महादेव शेलार 64 वर्षांचे होते.
मुलुंडमधील राहत्या घरी महादेव शेलार यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यानंतर त्यांना मुलुंडमधील फोर्टीस हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. पण तिथे त्यांना मृत घोषित करण्यात आलं. दरम्यान, पंचनामा सुरू असून घाटकोपरमधील राजावाडी हॉस्पिटलमध्ये महादेव शेलार यांचा मृतदेह पोस्टमार्टेमसाठी पाठविण्यात आला आहे.