मोदी सरकार विरोधात सिन्हा-पटोले यांच्यात खलबते

नागपूर  दि.15 सध्या भाजपापासून दुरावलेले खासदार नाना पटोले यांनी भाजपाचे ज्येष्ठ असंतुष्ट नेते यशवंत सिन्हा यांची रविवारी नागपूर विमानतळावर भेट घेतली. तब्बल दीड तासाच्या भेटीत या दोन्ही नेत्यांमध्ये केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांवर मंथन झाले. चर्चेत दोघांनीही सरकार विरोधात घेतलेल्या भूमिकेसाठी एकमेकांचे समर्थन केल्याची माहिती विश्वसनीय सुत्रांनी दिली. या भेटीमुळे दिवाळीच्या तोंडावर पुन्हा केंद्र सरकारला फटाके लावण्याची मोहीम तीव्र होणार असल्याचे संकेत मिळाले आहेत.
यशवंत सिन्हा यांनी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या अर्थनितीवर उघडपणे प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. जेटली यांनी पलटवार केल्यावर सिन्हा यांनी त्यांना तेवढ्याच ताकदीने उत्तर दिले होते. या वादात सिन्हा यांनी पंतप्रधान नरेंदद्र मोदी यांच्यावरही टीका केली होती. तर, खासदार नाना पटोले यांनी पंतप्रधान मोदी हे खासदारांचे ऐकूणच घेत नाही, त्यांना विरोधात बोललेले खपत नाही, असे उघड वक्तव्य करीत मोदी यांच्या कार्यशैलीवर प्रश्न उपस्थित केले होते. कृषी धोरणांबाबत मोदी सरकार गंभीर नाही, असा आरोप पटोले हे गेल्या काही दिवसांपासून सातत्याने करीत आहेत. नाराज असलेल्या या दोन्ही नेत्यांची संघभूमी असलेल्या नागपुरात घेतलेल्या या भेटीमुळे भाजपाच्या गोटात वादळ उठले आहे.
Previous articleआतापर्यंत 12 वेळा हत्येच्या धमक्या
Next articleएसटी कर्मचाऱ्यांनी संपाची हाक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here