४८ व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी सहा मराठी चित्रपटांची निवड

४८ व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी सहा मराठी चित्रपट
मुंबई, दि. १६ गोवा येथे होणाऱ्या ४८ व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी सहा मराठी चित्रपटांची निवड करण्यात आली आहे. या चित्रपटांमध्ये झाला बोभाटा, पिंपळ, फिरकी, दशक्रीया आणि हृदयांतर, बंदुक्या या सहा चित्रपटांचा समावेश आहे.
गोवा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सन २०१५ पासून एनएफडीसी च्या फिल्मबाजार मध्ये मराठी चित्रपट शासनातर्फे पाठविण्यात येत आहे. या महोत्सवात अनेक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय निर्माते, दिग्दर्शक, समीक्षकांनी तसेच चित्रपट रसिकांनी हे चित्रपट पाहिले. त्यामुळे मराठी चित्रपट आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर पोहचण्यास मदत झाली.या वर्षी २० नोव्हेंबर ते २४ नोव्हेंबर या कालावधीत ४८ वा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव गोवा येथे संपन्न होत आहे. या चित्रपट महोत्सवासाठी महाराष्ट्र शासनातर्फे ६ मराठी चित्रपटासहित प्रतिनिधित्व करण्याचे ठरले आहे. याकरिता मराठी चित्रपटांच्या सहभागासाठी वर्तमानपत्रात जाहीर सूचना प्रसिध्द करुन चित्रपट निर्मात्यांकडून प्रवेशिका मागविण्याची प्रक्रीया पार पाडण्यात आली. महोत्सवाकरिता चित्रपटांच्या परीक्षणासाठी पाच सदस्यीय समिती गठीत करण्यात आली होती.

 

Previous articleचर्चा निष्फळ, एसटी कर्मचारी संपावर जाणार
Next articleभाजप सरकार बंडलबाजः खा. अशोक चव्हाण

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here