राज ठाकरे साधणार नगरसेवकांशी संवाद

मुंबई दि. 16  मुंबई महानगरपालिकेतील सहा नगरसेवक गळाला लावत शिवसेनेने झटका दिल्यानंतर आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्षाच्या डॅमेज कंट्रोलच्यादृष्टीने पावले उचलायला सुरूवात केली आहे. त्यानुसार राज लवकरच पुणे, नाशिक आणि कल्याण-डोबिंवली येथील महानगरपालिकांमधील मनसेच्या नगरसेवकांना भेटणार आहेत.

या दौऱ्यादरम्यान नगरसेवकांना येणाऱ्या अडचणी आणि प्रश्न राज ऐकून घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. पुणे, नाशिक आणि कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत मनसेचे अनुक्रमे ३, ५ आणि १० नगरसेवक आहेत. २००९ च्या तुलनेत या सर्व पालिकांमधील मनसेचे संख्याबळ मोठ्याप्रमाणावर घटले असले तरी या ठिकाणी पक्ष अस्तित्त्वापुरता उरला आहे. त्यामुळे येत्या काळात पक्षाला पुन्हा भरारी घ्यायची असल्यास राज ठाकरे यांना पक्षबांधणीवर अधिक भर देणे गरजेचे आहे. त्यादृष्टीने पालिकेतील हे नगरसेवक मनसेसाठी महत्त्वाचे आहेत.

Previous articleराज्यातील 3,666 ग्रामपंचायतींसाठी 81 टक्के मतदान
Next articleविविध पक्षांचे १५ ते २० आमदार संपर्कात –  आठवले यांचा गौप्यस्फोट

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here