मुंबई नगरी टीम
मुंबई । महाराष्ट्र पोलिसांत अशाप्रकारची अराजकता यापूर्वी कधीच नव्हती.परमबीर सिंहांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. यामुळे महाराष्ट्र सरकारची अब्रू वेशीला टांगली आहे.अनिल देशमुख यांनी वाझेंना वसुलीच काम दिले होते का ? हे महाविकास आघाडीने स्पष्ट करावे तसेच संशयित असलेल्या अनिल देशमुख यांनी गृहमंत्री पदाचा तात्काळ राजीनामा द्यावा”, अशी थेट मागणी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर प्रवीण दरेकर यांनी केली आहे.
गृहमंत्री अनिल देशमुख यांनी प्रत्येक महिन्याला १०० कोटी रुपयांची वसुली करण्याचे टार्गेट सचिन वाझे यांना दिले होते, असा खळबळजनक दावा परमबीर सिंग यांनी केला आहे. परमबीर सिंग यांनी केलेल्या आरोपा नंतर भाजप व विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी गृहमंत्री पदावरून अनिल देशमुख यांना हकालपट्टी करण्यासाठी तीव्र आंदोलन करताना सरकारवर टीका केली आहे.महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीला, परंपरेला काळीमा फासणारी गोष्ट झाली आहे. रक्षक भक्षक बनत असेल, कुंपणच जर शेत खात असेल तर राज्यातील जनता कोणावर विश्वास ठेवणार असा प्रश्न जनतेसमोर उभा होत असल्याचे दरेकर यांनी सांगितले.
महाराष्ट्राच्या इतिहासात कधीच अशी गोष्ट झाली नाही.राजकीय स्वरूपात गुन्हेगारी प्रवृत्ती होत असते,आरोप होत असतात परंतु दस्तूरखुद्द राज्याचा पोलीस अधिकारी परमबीर सिंग पत्राद्वारे जर सांगत असेल, शंभर कोटोची खंडणी वाझेच्या माध्यमातून झाली पाहिजे. अशा प्रकारच्या गोष्टी जर बाहेर येत असतील तर राज्याच्या पोलिस खात्यात काय चाललं आहे हे समजायला वेळ लागणार नाही अशी टीका दरेकर यांनी केली.ज्यावेळी विधिमंडळात आम्ही हा विषय मांडत होतो, त्यावेळी वाझेंची पाठराखण कोण करत होतं? असा सवाल दरेकर यांनी उपस्थित करताना म्हणाले खरं तर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी महाराष्ट्र पोलिसांची इभ्रत धुळीला मिळविण्याचं काम केलं आहे. त्यामुळे त्यांनी तात्काळ राजीनामा देण्याची आवश्यकता आहे”, तसेच नाहीतर राज्याच्या मुख्यमंत्री यांनी आपली प्रतिमा वाचवण्यासाठी गृहमंत्र्यांचा राजीनामा घ्यावा अशी विनंती दरेकर यांनी केली आहे.
सरकारची भूमिका गुन्हेगारांना पाठीशी घालण्यासाठी आहे. चुकीच्या गोष्टी हे सरकार पाठीशी घालत असते. तसेच वाझे प्रकरणावरून विरोधकांवर टीका करण्यात आली, पोलिसाची प्रतिमा मलिन करतात, राजकीय अभीवेशनातून बोलत आहे. परंतु हे सरकार प्रत्येक प्रकरणात उशिरा चौकशी करतात त्यामुळे गुन्हेगाराणा पुरावे नष्ट करायला सरकार संधि तर देत नाही ना असा संशय जनतेच्या मनात आता उभा होत आहे असे दरेकर यांनी सांगितले. सरकार खंडणी मागण्यासाठी आहे का ? दरेकर यांनी उदाहरण देत असताना म्हणाले, राष्ट्रवादी कोंग्रेस पक्षाचे आर. आर. पाटील गृहमंत्री असताना त्यांनी डांस बार बंद केले, तरुण पिढी उद्ध्वस्त होती त्यांना वाचवण्यासाठी लोकांचे संसार वाचवण्यासाठी, महिलांसाठी भूमिका घेतल्या तसेच त्याच राष्ट्रवादी कॉँग्रेसचे अनिल देशमुख आहे परंतु बदलतं स्वरूप आता दिसून येत आहे. अशी टीका दरेकर यांनी महाविकास आघाडी सरकारवर केली.निंदनीय असा आरोप आहे.सत्य वस्तूस्थिती हे राज्यातील जनतेला समजली पाहिजे. त्यामुळे ह्याची चौकशी झाली पाहिजे. अशी विनंती दरेकर यांनी आंदोलनात केली.