महसूलमंत्र्याची ईडीकडून चौकशी करा

महसूलमंत्र्याची ईडीकडून चौकशी करा

 शिवसेना आमदाराच्या मागणीने खळबळ

  कोल्हापुर दि. 22  सत्तेत असणा-या शिवसेना आणि भाजपातील दुरावा वाढतच चालला असुन, कोल्हापुरातील शिवसेना आ. राजेश क्षीरसागर यांनी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर निशाणा साधला आहे. महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी महसूल आणि सार्वजनिक बांधकाम खात्याचा गैरवापर करत वारेमाप संपत्ती जमा केली असल्याचा  गंभीर आरोप आ. क्षीरसागर यांनी केला आहे. महसूलमंत्री पाटील यांच्या संपत्तीची अंमलबजावणी संचालनालयातर्फे चौकशी करण्यात यावी अशी मागणी आ. क्षीरसागर यांनी केली आहे. कोल्हापुर मध्ये आयोजित करण्यात आलेल्या एका मेळाव्यात त्यांनी ही मागणी करून खळबळ उडवून दिली आहे.

मी आणि महसूलमंत्री चंद्रकांत पाटील आम्ही दोघेही एकाच वेळी आमदार झालो. आजही दोघे एकत्र काम करत आहोत, मात्र महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांची त्यावेळेची आणि सध्याची आर्थिक परिस्थिती यामध्ये मोठा फरक पडला असल्याचे आ. क्षीरसागर यांनी या मेळाव्यात सांगितले . सार्वजनिक बांधकाम आणि महसूल खात्याचा गैरकारभार झाल्यानेच  पाटील यांची संपत्ती वाढली आहे. कोल्हापुरात निवडणुका आल्या की लाखो रूपयांची उधळण केली जाते. हा पैसा येतो कुठून असा सवाल करीत याची चौकशी ईडीमार्फत झालीच पाहिजे अशीही मागणी आ. क्षीरसागर यांनी केली आहे.

Previous articleशेतकरी, शेतमजूरांचे जीव घेणाऱ्यांना राज्य शासन योग्य धडा शिकवेल
Next articleयवतमाळ मधिल घटनेला कृषी मंत्रालय जबाबदार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here