यवतमाळ मधिल घटनेला कृषी मंत्रालय जबाबदार

यवतमाळ मधिल घटनेला कृषी मंत्रालय जबाबदार

शरद पवार

नागपुर दि. 23 यवतमाळ मध्ये फवारणी करताना परवाना नसलेले अप्रमाणित कीटकनाशक उपलब्ध असल्यामुळेच शेतकऱ्यांचा मृत्यू झाला असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा.शरद पवार यांनी करत याला कृषी मंत्रालय  जबाबदार असल्याचा आरोपही  केला आहे.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष  शरद पवार हे आज विदर्भाच्या दौ-यावर असून,  नागपूरवरुन अमरावतीला  रवाना  होण्यापूर्वी प्रसारमाध्यमांशी बोलत होते.  यवतमाळमध्ये फवारणी दरम्यान झालेल्या शेतकऱ्यांच्या मृत्यूवरुन त्यांनी राज्य सरकारवर टीकास्त्र सोडले . आघाडी सरकारच्या काळात फवारणी दरम्यान एकाही शेतकऱ्याचा मृत्यू झाला नाही असा दावा पवार यांनी केला किटकनाशकासाठी स्वतंत्र संस्था आणि कायदा अस्तित्वात आहे. कीटकनाशकाच्या विक्री आणि नियंत्रणाकरता या संस्था अस्तित्वात असल्याने त्यांच्या संमतीशिवाय कोणत्याही कीटकनाशकाची विक्री शक्य नसते,  अप्रमाणित कीटकनाशक बाजारात आल्यानेच शेतकऱ्यांचा मृत्यू झाला असून, यासाठी कृषी मंत्रालय जबाबदार असल्याची टीका त्यांनी केली.

Previous articleमहसूलमंत्र्याची ईडीकडून चौकशी करा
Next articleपंतप्रधान मोदींनी निवडणूक आयोगाला पिंजऱ्यात कैद असलेला पोपट बनवले 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here