अखेर आजही कर्जमाफीची रक्कम जमा झालीच नाही

अखेर आजही कर्जमाफीची रक्कम जमा झालीच नाही

मुंबई, दि.२६ गुरूवार म्हणजे आज पासुन शेतक-यांच्या खात्यावर कर्जमाफीची रक्कम जमा होण्यास सुरूवात होईल हा सरकारचा दावा सपशेल फोल ठरल्याचे चित्र आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आदेश देऊनही कर्जमाफीची रक्कम आज शेतक-यांच्या खात्यावर जमा झालीच नाही.काही तांत्रिक बाबींमुळे प्रत्यक्ष कर्जमाफीला उशीर होत असल्याने कर्जमाफीच्या प्रश्नावरून सहकार विभागाच्या अधिकाऱ्यांची दमछाक झाली आहे. उद्यापासुन ( शुक्रवार) टप्या टप्याने शेतक-यांच्या खात्यात रक्कम जमा होईल, असा दावा आता केला जात आहे. येत्या १५ नोव्हेंबरपर्यंत कर्जमाफीची सर्व प्रक्रिया पूर्ण होण्यास अवधी लागणार असल्याचेही समजते.

Previous articleभाजप खा. नाना पटोले उध्दव ठाकरे यांची भेट घेणार
Next articleराज्य शासनामार्फत ‘मंगेशकर स्कूल ऑफ म्युझिक’ उभारणार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here