मुंबई नगरी टीम
मुंबई । ऐन दिवाळीत राज्य सरकारने राज्यातील नियुक्तीच्या प्रतिक्षेत असलेल्या तीन वरिष्ठ सनदी अधिका-यांच्या नियुक्त्या आज केल्या आहेत.डॅा.संजय चहांदे यांची मागास बहुजन कल्याण विभाग मंत्रालयात अपर मुख्य सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
डॅा. संजय चहांदे,एस.ए. तागडे आणि पंकज कुमार हे तीन वरिष्ठ सनदी अधिकारी नियुक्तीच्या प्रतिक्षेत होते.आज या तिन्ही सनदी अधिका-यांच्या राज्य सरकारने नियुक्त्या केल्या आहेत.डॅा. संजय चहांदे यांची मागास बहुजन कल्याण विभाग मंत्रालयात अपर मुख्य सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.एस.ए तागडे यांची महाराष्ट्र पेट्रोकेमिकल्स महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे तर पंकज कुमार यांची महाराष्ट्र राज्य मत्सव्यवसाय विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.