अन्यथा मराठा समाज गनिमी कावा आंदोलन छेडणार
मुंबई दि.२९ मराठा समन्वय समितीने मराठा आरक्षणासह विविध मागण्यांसाठी राज्य सरकारला दोन महिन्याचा अल्टीमेटम दिला असून, अन्यथा यापुढे गनिमी कावा आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे.राज्यात उद्रेक घडल्यास याला सरकारच जबाबदार असेल,असा इशारा समितीने दिला आहे. औरंगाबादेत समितीची महासभा पार पडली.यावेळी हा निर्णय घेण्यात आला.
सरकारला आश्वासनपूर्तीसाठी दोन महिन्यांचे अल्टीमेटम देण्याचा निर्णय आजच्या महासभेने घेतला आहे. अन्यथा या पुढे गनिमी कावा आंदोलन करणार असून, पुढील उद्रेकास सरकार जबाबदार असेल,असा इशाराही देण्यात आला आहे.आज पार पडलेल्या महासभेला राज्यभरातील २०० प्रतिनिधी उपस्थित होते.सरकारी नोकरी आणि शिक्षणात आरक्षण देण्याची मागणी मराठा समाजाने यापूर्वीपासुन लावून धरली आहे.त्यासाठी राज्यभरातील विविध जिल्ह्यात लाखोंचे मूक मोर्चाही काढण्यात आले.मुंबईत ९ ऑगस्टला मराठा समाजाने अखेरचा मूक मोर्चा काढत,आरक्षणाची मागणी केली होती.