मुंबई नगरी टीम
मुंबई । राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या विविध विभागात आणि जिल्हा परिषदअंतर्गत २.४४ लाखांपेक्षा अधिक पदे रिक्त असल्याचे उघड झाले आहे.शासकीय विभाग व जिल्हा परिषदेतील ३१ डिसेंबर,२०२० पर्यंतची माहिती उपलब्ध असून,एकूण २९ शासकीय विभाग आणि जिल्हा परिषद यात मंजूर पदांची संख्या १० लाख ७० हजार ८४० इतकी आहे. यापैकी ८ लाख २६ हजार ४३५ ही पदे भरलेली आहेत. तर २ लाख ४४ हजार ४०५ इतकी पदे रिक्त असल्याची बाब माहिती अधिकारात समोर आली आहे.
माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांना राज्य सराकारने यासंदर्भातील माहिती दिली आहे. महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत सर्व वर्गातील एकूण पदांची माहिती देताना मंजूर पदे, भरलेली पदे आणि रिक्त पदांची माहिती त्यांनी मागितली होती.सामान्य प्रशासन विभागाने गटनिहाय शासकीय व जिल्हा परिषदेतील गट अ, ब, क आणि ड मधील दिनांक ३१ डिसेंबर २०२० यापर्यंतची माहिती उपलब्ध करुन दिली.एकूण २९ शासकीय विभाग आणि जिल्हापरिषद यात मंजूर पदांची संख्या १० लाख ७० हजार ८४० इतकी आहे.त्यापैकी ८ लाख २६ हजार ४३५ पदे भरलेली आहेत. तर २ लाख ४४ हजार ४०५ पदे रिक्त आहेत.यात शासकीय कर्मचाऱ्यांची १ लाख ९२ हजार ४२५ तर जिल्हापरिषदेच्या ५१ हजार ९८० अशी एकूण २ लाख ४४ हजार ४०५ पदे रिक्त आहेत. गृह विभागात एकूण मंजूर पदे २ लाख ९२ हजार ८२० असून त्यापैकी ४६ हजार ८५१ पदे रिक्त आहेत. सार्वजनिक आरोग्य विभागात एकूण मंजूर पदे ६२ हजार ३५८ असून त्यापैकी २३ हजार ११२ पदे रिक्त आहेत.जलसंपदा विभागात एकूण मंजूर पदे ४५ हजार २१७ असून त्यापैकी २१ हजार ४८९ पदे रिक्त आहेत.
महसूल व वन विभागात एकूण मंजूर पदे ६९ हजार ५८४ असून त्यापैकी १२ हजार ५५७ पदे रिक्त आहेत. उच्च व तंत्र विभागात एकूण मंजूर पदे १२ हजार ४०७ असून त्यापैकी ३ हजार ९९५ पदे रिक्त आहेत. वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागात एकूण मंजूर पदे ३६ हजार ९५६ असून त्यापैकी १२ हजार ४२३ पदे रिक्त आहेत. आदिवासी विकास विभागात एकूण मंजूर पदे २१ हजार १५४ असून त्यापैकी ६ हजार २१३ पदे रिक्त आहेत. शालेय शिक्षण व क्रिडा विभागात एकूण मंजूर पदे ७ हजार ५० असून त्यापैकी ३ हजार ८२८ पदे रिक्त आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागात एकूण मंजूर पदे २१ हजार ६४९ असून त्यापैकी ७ हजार ७५१ पदे रिक्त आहेत. सहकार पणन विभागात एकूण मंजूर पदे ८ हजार ८६७ असून त्यापैकी २ हजार ९३३ पदे रिक्त आहेत. सामाजिक न्याय विभागात एकूण मंजूर पदे ६ हजार ५७३ असून त्यापैकी ३ हजार २२१ पदे रिक्त आहेत. उद्योग, ऊर्जा व कामगार विभागात एकूण मंजूर पदे ८ हजार १९७ असून त्यापैकी ३ हजार ६८६ पदे रिक्त आहेत. वैद्यकीय शिक्षण विभागात एकूण मंजूर पदे ३६ हजार ९५६ असून त्यापैकी १२ हजार ४२३ पदे रिक्त आहेत. वित्त विभागात एकूण मंजूर पदे १८ हजार १९१ असून त्यापैकी ५ हजार ७१९ पदे रिक्त आहेत. शालेय शिक्षण विभागात एकूण मंजूर पदे ७ हजार ५० असून त्यापैकी ३ हजार ८२८ पदे रिक्त आहेत. अन्न व नागरी पुरवठा विभागात एकूण मंजूर पदे ८ हजार ३०८ असून त्यापैकी २ हजार ९४९ पदे रिक्त आहेत. महिला व बालविकास विभागात एकूण मंजूर पदे ३ हजार ९३६ असून त्यापैकी १ हजार ४५१ पदे रिक्त आहेत. विधि व न्याय विभागात एकूण मंजूर पदे २ हजार ९३८ असून त्यापैकी १ हजार २०१ पदे रिक्त आहेत. पर्यटन व सांस्कृतिक विभागात एकूण मंजूर पदे ७३५ असून त्यापैकी ३८६ पदे रिक्त आहेत. सामान्य प्रशासन विभागात एकूण मंजूर पदे ८ हजार ७९५ असून त्यापैकी २ हजार ३२५ पदे रिक्त आहेत.