मंत्रालयात डिजिटल दलाली सुरू असल्याचा राष्ट्रवादीचा आरोप
मुंबई दि.२ राज्य सरकारच्या अनेक योजनांची कामे ही डीजीटलायझेशनच्या माध्यमातून सुरू असली तरी एकाही योजनेचे काम योग्य प्रकारे होत नसून,या कामाच्या निविदांमध्ये टें मोठा भ्रष्ट्राचार झाला असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला आहे. मलिक यांनी या प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या कार्यालयातील विशेष कार्य अधिकारी कौस्तुभ धवसे यांच्याकडे बोट दाखवले आहे.
राज्यातील सुमारे तीनशे योजनांचे डीजीटलायझेशन करण्याचे काम नागपूर येथील इनोविव्ह या कंपनीला देण्यात आले आहे. या कामासाठी निविदा मागवली होती का असा सवाल उपस्थित करून या निविदेसाठी कोण कोण स्पर्धक होते. त्यांची नावे जाहीर करावी असे आव्हान मलिक यांनी दिले आहे. मंत्रालयात सध्या १४४ विशेष कार्य अधिकारी आहेत. त्या सर्वांच्या नियुक्त्या बेकायदेशीर करण्यात आल्या आहेत. त्यांनी काही घोटाळा केला किंवा फसवणूक केली तर त्याला जबाबदार कोण असा सवाल ही मलिक यांनी केला आहे.