विशेष आर्थिक क्षेत्रामध्ये उभारण्यात येणा-या उद्योगांना मुद्रांक व नोंदणी शुल्क माफ
मंत्रिमंडळाचा महत्वपूर्ण निर्णय
मुंबई दि. ७ विशेष आर्थिक क्षेत्राच्या विकासकांना, सहविकासकांना तसेच या क्षेत्रात उभारण्यात येणाऱ्या उद्योगांना मुद्रांक व नोंदणी शुल्क माफ करण्याचा महत्वपूर्ण आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे.
या शिवाय पुढील दोन निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आले.
जालना येथील सीडपार्कची उभारणी कृषी विभागाकडून तर उद्योग विभाग पायाभूत सुविधा उपलब्ध करणार.
अहमदनगर जिल्ह्यातील मौजे पुणतांबा येथील महाराष्ट्र राज्य शेती महामंडळाची ३.७७ हेक्टर जमीन पाणी पुरवठा योजनेच्या साठवण तलावासाठी पुणतांबा ग्रामपंचायतीस देण्यास मान्यता.