होय….उध्दव ठाकरे यांनी माझी भेट घेतली !
शरद पवार यांच्याकडून दुजोरा
मुंबई दि.७ शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतल्याची जोरदार चर्चा असतानाच दहा दिवसांपूर्वी झालेल्या या बैठकीला शरद पवार यांनी दुजोरा दिला आहे. ठाकरे यांच्या सोबत खा. संजय राऊत हे देखील उपस्थित होते असेही त्यांनी स्पष्ट केले.
या भेटीबाबत शिवसेनेकडून अद्याप कोणतीही कसलेही स्पष्टीकरण करण्यात आलेले नसले तरी शरद पवार यांनो मात्र या वृत्ताला दुजोरा दिला आहे. पवारांनी या वृत्ताला दुजोरा दिल्यामुळे या भेटीचे महत्त्व प्रचंड वाढले आहे. या भेटीमुळे भाजपचे देखील धाबे दणाणले असून, शिवसेनेने सरकामधून बाहेर पडण्याची तयारी सुरू केली असल्याची जोरदार चर्चा सुरु आहे.