मुंबई नगरी टीम
मुंबई । संपूर्ण देशात मोदी सरकार बद्दल चांगले वातावरण आहेजनतेची चांगली साथ मोदींना मिळत आहे.मोदींच्या चारशे पारच्या नाऱ्यावर विजयाचा शिक्कामोर्तब होणार आहे.काँग्रेस आणि इंडी आघाडीने अनेक अफवा आणि दुषप्रचार केला असला तरी त्या काँग्रेसच्या अफवांचा चक्काचूर होणार आहे.नरेंद्र मोदी या देशाचे तिसऱ्यांदा प्रधानमंत्री नक्की होतील असा विश्वास रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केला.
यशवंतराव चव्हाण सेंटर येथे आयोजित पत्रकार परिषदेत आठवले बोलत होते.काँग्रेस आणि इंडी आघाडी ने सत्तेत येण्याची अनेक सप्न पहिली आहेत.चार जून नंतर मोदी जातील असे राहुल गांधीना स्वप्न पडत आहे.त्यांनी सत्तेत आल्यास महिलांच्या बँक खात्यात खटाखट खटाखट १ लाख रुपये टाकू अशी खोटी आशा दिली आहे.मात्र काँग्रेसचे सरकार काही येत नाही.पण ते खटाखट पैसे टाकत असतील तर आम्ही महिलांना सांगू तुम्ही पटापट पटापट ते पैसे घ्या.राहुल गांधीना माझे आवाहन आहे की त्यांचे सरकार येणार नाही मात्र सरकार आले नाही तरी त्यांनी कोट्यावधी महिलांच्या खात्यावर १ लाख रुपये खटाखट टाकावेत असे सांगत ना.रामदास आठवलेंनी राहुल गांधी आणि काँग्रेस इंडी आघाडीच्या सत्ता मिळण्याचा स्वप्नांचा जनता चक्काचूर करणार असल्याचा पुनरुच्चार आठवले यांनी केला.
संविधान कधीही कोणीही बदलू शकत नाही हे त्रिकाल सत्य आहे.मात्र तरीही संविधान बदलले जाईल अशी खोटी अफवा पसरवण्याचा आणि दलित जनतेत संभ्रम निर्माण करण्याचा काँग्रेस इंडी आघाडीचा प्रयत्न फसला आहे.संविधान बदलण्याचा आरोप हा बिनबुडाचा आरोप आहे हे सत्य दलित जनतेला कळले असून संविधानाला कोणताही धोका नसल्याचा विश्वास प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी देशाला दिला आहे. त्यामुळे काँग्रेस इंडी आघाडीच्या खोट्या अफवांना भिक न घालता दलित मुस्लिम ओबीसी जनतेने एनडीए सोबत महायुती सोबत राहावे असे आवाहन आठवलेंनी केले.काँग्रेस आणि इंडी आघाडीला बहुमत मिळणार नाही.त्यांच्या कडे प्रधानमंत्री पदाचा एकही उमेदवार नाही.त्यासाठी त्यांच्यात ऐक्य नाही.फुटीच्या उंबरठ्यावर इंडी आघाडी असून चार जून ला लोकसभा निवडणुकीचा निकाल लागल्या नंतर इंडी आघाडीची माळ फुटून विखरणार आहे. येत्या चार जून ला मोदी सरकार स्पष्ट बहुमत मिळवून पुन्हा तिसऱ्यांदा सत्तेवर येणार आहे असा विश्वास आठवलेंनी व्यक्त केला.