सोलापूर विद्यापीठ कुलगुरु निवडीसाठी समिती गठीत

सोलापूर विद्यापीठ कुलगुरु निवडीसाठी समिती गठीत

मुंबई दि. ९ सोलापूर विद्यापीठाच्या नव्या कुलगुरू निवडीची प्रक्रिया सुरू झाली असून, राज्यपाल तथा कुलपती चे विद्यासागर राव यांनी सर्वोच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त न्यायाधीश पी वेंकटरामा रेडडी यांच्या अध्यक्षतेखाली कुलगुरू निवड समिती गठीत केली आहे.

इंडियन इंस्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, रायपूरचे संचालक प्रा. भरत भास्कर तसेच शासनाचे अतिरिक्त मुख्य सचिव प्रवीण परदेशी हे या कुलगुरु निवड समितीचे सदस्य असतील.
विद्यमान कुलगुरु प्रो एन एन मालदार यांचा कार्यकाळ पुढील महिन्यात १० डिसेंबर रोजी संपत असल्याच्या पार्श्वभूमीवर राज्यपालांनी ही निवड समिती गठित केली आहे.

Previous articleमुंबईतील आपत्ती निवारण्यासाठी विशेष उपसमिती गठीत
Next articleगुजरात निवडणूकीत सत्ता आणि पैशाचा वापर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here