ज्ञानेश्र्वर साळवे हा “राष्ट्रवादीचा” कार्यकर्ता ?

ज्ञानेश्र्वर साळवे हा “राष्ट्रवादीचा” कार्यकर्ता ?

मुंबई दि.१० मंत्रालयाच्या सातव्या मजल्यावरून आत्महत्येचा प्रयत्न करणारा ज्ञानेश्र्वर साळवे हा तरूण शेतकरी राष्ट्रवादीचा कार्यकर्ता असल्याचे त्याच्या फेसबुक वाॅलवरून स्पष्ट होत असल्याने आज केलेले आत्महत्या नाट्य हे राजकीय होते का अशी जोरदार चर्चा आहे.

दुपारी चारच्या सुमारास मंत्रालयाच्या सातव्या मजल्यावरील सज्जावर उभे राहून आत्महत्येचा प्रयत्न करणारा तरूण शेतकरी हा तुळजापुर तालुक्यातील मसला खुर्द येथील असून, ज्ञानेश्र्वर अण्णा साळवे असे त्याचे नाव आहे. त्यास पाच एकर शेती असून, तो स्वतः शिक्षित असूनही शेळ्या राखण्याचे काम करतो तर त्याची आई मोलमजुरी करते.त्याने यापूर्वी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा कार्यकर्ता म्हणून शेतमालाला भाव मिळावा म्हणून आंदोलन केले होते. सध्या शेतमालाचे खास करुन सोयाबीनचे दर गडगडल्याने तो नैराश्यग्रस्त झाला होता.

ज्ञानेश्र्वर साळवे यांने गेल्या फेब्रूवारी महिन्यात राष्ट्रवादी काॅग्रेस मध्ये जाहीर प्रवेश केल्याचा फोटो फेसबुकवर टाकला असल्याने तो राष्ट्रवादीचा कार्यकर्ता असल्याचे स्पष्ट होते. तुळजापूरच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगराध्यक्षा यांचे पती यांनी त्याच्या गळ्यात राष्ट्रवादीचा दुपट्टा टाकतानाचा हा फोटो आहे.त्यामुळे त्याने आज केलेले आंदोलन राजकीय होते का अशी शंका उपस्थित केली जात आहे.

Previous articleराणे मंत्री होणारच ! सरकारही स्थिर राहणार
Next articleआ. पाटील यांनी काढली बादशहा शाहरूख खानची खरडपट्टी !

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here