सावित्रीबाई फुले विद्यापीठातील “शाकाहारी” संदर्भातील परिपत्रक २००६ चे

सावित्रीबाई फुले विद्यापीठातील “शाकाहारी” संदर्भातील परिपत्रक २००६ चे

शिक्षणमंत्री विनोद तावडे यांचे स्पष्टीकरण

मुंबई दि.११ सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे सर्वोत्कृष्ट विद्यार्थ्यांसाठी देण्यात येणा-या शेलार मामा सुवर्णपदकासाठी तो विदयार्थी शाकाहरी असावा अशी अट असेलेले परिपत्रक विद्यापीठाने जारी केले असले तरीही हा निर्णय २००६ मध्ये घेण्यात आला असून तो जूना आहे, असे राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी स्पष्ट केले आहे.

कोणत्याही विदयापीठाने विद्यार्थ्यांना कोणतीही शिष्यवृत्ती वा पदक देताना घटनेतील मूलभूत अधिकाराला बाधा न येता विद्यार्थ्याची निवड करावी. देणगीदाराकडून पुरस्कृत करण्यात येणारी कोणतीही शिष्यवृत्ती वा पदक यासाठीच्या निकषासाठी विषमता निर्माण करणारी कोणतीही अट कोणत्याही विद्यापीठाने स्वीकारू नये, असेही सर्व विद्यापीठांना कळविण्यात आले आहे.  देणगीदार पुरस्कृत पदक व शिष्यवृत्तीसाठी विद्यार्थ्यांची निवड करताना घटनेने जे मुलभूत अधिकार दिले आहेत त्यामध्ये भेदभाव न करता मुलूभूत अधिकारांतर्गतच विद्यार्थ्यांची निवड करण्यात यावी अशा स्पष्ट सूचना सर्व विद्यापीठांना देण्यात आल्या आहेत.

राज्यातील विद्यापीठाकडून देण्यात येणारी शिष्यवृत्ती अथवा पदकासाठी कोणत्याही प्रकारचे भेदभाव न करता त्याची निवड केवळ गुणवत्तेच्या आधारे करण्यात यावी अशा सूचना प्रत्येक विद्यापीठाला देण्यात आल्याचे तावडे यांनी प्रसिध्द केलेल्या पत्रकात नमूद केले आहे.

Previous articleसुनिल तटकरेंनी साळवेला “त्या” प्रकारापासून रोखण्याचा केला होता प्रयत्न !
Next articleफेरीवाला मुद्यावरुन शिवसेना मनसेत “सामना” रंगणार !

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here