आज मध्य रात्रीपासून हाॅटेल मधिल जेवण स्वस्त होणार!

आज मध्य रात्रीपासून हाॅटेल मधिल जेवण स्वस्त होणार!

१८ ऐवजी ५ टक्के जीएसटी आकारण्यात येणार

मुंबई दि.१४ आज मध्य रात्री पासून हॉटेलच्या बिलामध्ये बऱ्या पैकी कपात होणार आहे. हॉटेलमध्ये आज मध्य रात्री पासून केवळ ५ टक्के वस्तु व सेवा कर (जीएसटी) आकारण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत अशी माहिती राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांनी दिली.

उद्यापासून कोणत्याही हॉटेल चालकाने ५ टक्क्यांपेक्षा जास्त जीएसटी आकारल्यास त्याच्या विरोधात कारवाई करण्याचा इशाराही बापटांनी दिला आहे. यापूर्वी वेगवेगळ्या श्रेणीच्या हॉटेल्समध्ये वेगवेगळा जीएसटी आकारण्यात येत होता. ९ टक्क्यांपासून २८ टक्क्यांपर्यंत जीएसटी लागल्याने सरकारवर चहू बाजूने टीका सुरु झाली होती. जीएसटी परिषदेने सर्व प्रकारच्या हॉटेलना सरसकट ५ टक्के जीएसटी लागणार असल्याचे जाहीर केले होते. त्याची अंमलबजावणी आज मध्य रात्री पासून होणार आहे.

उद्या बुधवार पासून हॉटेल मधील दर पत्रकात बदल करणे आवश्यक असणार आहे. जे हॉटेल मालक दर कमी करणार नाहीत त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. यासाठी सरकार हेल्पलाईन नंबर 1800225900 सुरू करणार आहे.’ अशी माहिती बापट यांनी दिली.या निर्णयामुळे खवयांना मोठा दिलासा मिळाला आहे. सुरुवातीला हॉटेल मधिल पदार्थांवर तब्बल १८ टक्के जीएसटी आकारण्यात येत होता. आता सरकारने १८ टक्क्यांवरुन थेट 5 टक्क्यांवर जीएसटी आणला आहे.

Previous articleराष्ट्रवादीच्या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांना यापुढे “नो एन्ट्री”
Next articleराज्यातील १०७ सिंचन प्रकल्पांना केंद्र सरकारची मान्यता

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here