पाशा पटेल यांना राज्यमंत्र्याचा दर्जा

पाशा पटेल यांना राज्यमंत्र्याचा दर्जा

मुंबई दि.१६ राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांना राज्यमंत्रीपदाचा दर्जा देण्यात आला आहे.सरकारच्या वतीने त्या संदर्भातील शासन निर्णय आज जारी करण्यात आला आहे.

राज्यातील शेतीमालाला किफायतशीर भाव मिळावेत आणि ग्राहकांना वाजवी दरात शेतमाल खरेदी करता यावा या दुहेरी उद्देशाने राज्य कृषी मूल्य आयोग गठीत करण्यात आला असून, सय्यद पाशा उस्मानसाहब पटेल म्हणजेच ‘पाशा पटेल’ यांची या आयोगाचे अध्यक्ष म्हणून गेल्या जूलै महिन्यात नियुक्ती करण्यात आली आहे.या आयोगाच्या माध्यमातुन करावे लागणारे राज्याचे प्रतिनिधित्व याचा विचार करून पाशा पटेल यांना राज्यमंत्रीपदाशी समकक्ष दर्जा देण्यास मान्यता देण्यात आली आहे.

Previous articleविधानपरिषदेच्या निवडणूकीपूर्वी सुनावणी असल्याचे लक्षात ठेवा !
Next articleकारंबा पंपगृहाचे काम 3 महिन्यात पूर्ण होणार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here