हमीभाव द्यायला पैसा नाही, पण आमदारांना विकत घेण्यासाठी भाजपाकडे कोट्यावधी रूपये!
शिवसेनेचा भाजपवर हल्लाबोल
मुंबई दि.१७ अहमदनगरमध्ये झालेल्या ऊस दरासाठीचे आंदोलन चिघळून त्याला हिंसक वळण लागले होते. या शेतक-यांच्या आंदोलनावरुन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपावर निशाणा साधला आहे. ‘राज्यात सध्या सत्तेवर असलेल्यांनी निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांना आकाशातून चंद्र-सूर्य आणून देऊ असे आश्वासने दिली होती, पण आज शेतकरी हमीभावासाठी रोज मरण पत्करत आहे. शेतकऱ्यांना हमीभाव द्यायला सरकारकडे पैसा नाही, पण आमदारांना विकत घेण्यासाठी भाजपाच्या तिजोरीत आणि त्यांच्या मंत्र्यांच्या खिशात कोट्यवधी रुपये आहेत”, अशा शब्दात शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपाचा सामना संपादकीयमधून समाचार घेतला आहे.
कन्नडचे शिवसेना आमदार हर्षवर्धन जाधव यांनी भाजपा प्रवेशासाठी ५ कोटी रुपयांची ऑफर देण्यात आली होती, असा गौप्यस्फोट केला होता. यावरुन शिवसेनेचे पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांनी सामनाच्या सपादकीय मधून भाजपावर खोचक टीका केली आहे.