मुख्यमंत्री माझं ऐकतात, हे खरं नाही

मुख्यमंत्री माझं ऐकतात, हे खरं नाही

शरद पवार यांचे शेतक-यांना स्पष्टीकरण

यवतमाळ दि.१७ आमच्या अडचणी तुम्ही मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवा, कारण मुख्यमंत्री तुमचं ऐकतात, अशी व्यथा यवतमाळ मधिल शेतक-यांनी आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे मांडली पण ‘मुख्यमंत्री माझ ऐकतात, हे खरं नाही’ असे पवार यांनी शेतक-यांना सांगितले.

विदर्भाच्या दौ-यावर असलेले राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज यवतमाळला भेट देवून शेतक-यांच्या व्यथा जाणून घेतल्या, बोंडअळीग्रस्त कापसाची त्यांनी आज यवतमाळमध्ये जाऊन पाहणी केली तेव्हा, काही शेतकऱ्यांनी शरद पवारांकडे त्यांच्या अडचणी मांडल्या. काही शेतकऱ्यांनी पवारांना सांगितले की, आमच्या व्यथा, अडचणी तुम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत पोहोचवा, कारण मुख्यमंत्री तुमचं ऐकतात, त्यावर पवार म्हणाले, ‘मुख्यमंत्री माझं ऐकतात, हे खरं नाही. पवार यांनी आज यवतमाळ येथिल कीटकनाशक फवारणीने दगावलेल्या शेतकरी, शेतमजुर कुटुंबीयांची भेट घेवून सांत्वन केले.

Previous articleतळागाळातल्या माणसात बाळासाहेबांनी उत्साह भरला
Next articleपरळी – बीड – नगर रेल्वे मार्गासाठी राज्य शासनाने वितरित केला ७७ कोटीचा निधी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here