चंद्रकांत पाटलांनी घेतली शरद पवारांची भेट

चंद्रकांत पाटलांनी घेतली शरद पवारांची भेट

वर्धा दि.१८ राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यात आज वर्धा येथील शासकीय विश्रामगृहात अर्धा तासापेक्षा अधिक वेळ बंद दरवाजाआड चर्चा झाली. आगामी विधानपरिषद पोटनिवडणूकीच्या पार्श्वभूमीवर या दोन नेत्यांमध्ये चर्चा झाल्याचे बोलले जात आहे.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे गेल्या चार दिवसांपासून विदर्भाच्या दौ-यावर आहेत. महसूलमंत्री चंद्रकांत पाटील काल रात्री येथिल विश्रामगृहात पोहोचले. त्यानंतर आज त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कामाची आढावा बैठक घेतली. शरद पवार आणि चंद्रकांत पाटील एकाच विश्रामगृहात मुक्कामी असल्याने दोघांचीही भेट झाली. यावेळी पाटील यांनी शरद पवारांशी दीर्घकाळ चर्चा केली. पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मेळाव्यात सत्ताधारी पक्षाचे लोक चार दिवसांत आपल्याला भेटले असल्याचे सांगितले.परंतु सुमारे अर्धा तासापेक्षा जास्त चाललेल्या या बंद दरवाजा आड बैठकीत पाटील यांनी पवारांशी आगामी विधानपरिषदेच्या निवडणूकीसंदर्भात चर्चा केल्याची सूत्रांची माहिती आहे.

Previous articleमाता बालमृत्यु रोखणाऱ्या सामाजिक संस्थांबरोबर शासनही पुढाकार घेणार
Next articleभाजप सरकार बिनडोक आणि डरपोक !

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here