भाजप सरकार बिनडोक आणि डरपोक !
राज ठाकरे यांचा हल्लाबोल
ठाणे दि.१८ राज्यातील आणि केंद्रातील भाजपचे सरकार मूर्ख , बिनडोक आणि डरपोक असल्याची घाणाघाती टीका मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ठाण्यात झालेल्या विराट सभेत केली. राज ठाकरे यांनी आपल्या भाषणात केंद्र आणि राज्य सरकारवर हल्लाबोल केला.
मनसेची सभा म्हणली की, शांतता क्षेत्राचा मुद्दा उपस्थित केला जातो. आत्ता सभा चालू असताना नाशिकमध्ये केबल बंद केले आहे.माझे भाषण सुरू असताना या सरकारला लाईट बंद करावी लागते त्यामुळे हे सरकार किती डरपोक आहे याची हि पावती असल्याची टीका राज ठाकरे यांनी केली. २०१४ साली मनसेने विकासाची ब्लू प्रिंट दाखवून निवडणूका लढवल्या आणि भाजपवाले गुजरात मध्ये ब्लू फिल्म दाखवून निवडणूका लढवत असल्याची टीका राज ठाकरे यांनी केली. राहुल गांधीना पप्पू म्हणून हिनवता मग तुमची का फाटते असा टोला त्यांनी भाजपला लगावला. राज्यातील सरकार डरपोक आहे त्यामुळेच त्यांनी सभेला आडकाठी आणली, आत्मविश्वास नसला की असे करतात असा आरोपही त्यांनी राज्य सरकारवर केला.
फेरीवाले हटविल्याने मुंबई आणि उपनगरातील रेल्वे स्थानके मोकळा श्वास घेत आहेत असा दावा राज ठाकरे यांनी करून अनधिकृत फेरीवाल्यांच्या बाजूने काॅग्रेस , भाजप आणि शिवसेना केवळ पैशासाठी उभे असल्याचा हल्लाबोल त्यांनी केला. राज ठाकरे यांनी आपल्या भाषणात भाजपवर निशाणा साधला. भाजप सत्तेचा अमरपट्टा घेवून आले नाहीत. सत्ता बदलल्यावर तुमच्यावर दरोड्याच्या केसेस टाकू असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. राज्य सरकार मधिलच एकाने दिलेल्या माहितीनुसार सरकार उच्च न्यायालयाच्या आदेशाला कोणाला तरी उभे करून सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणार असल्याचे समजते असा गौप्यस्फोट राज ठाकरे यांनी केला. हे सरकारचे काम आहे का असा सवाल करत हे केवळ पैशासाठी चालले असल्याचा आरोप केला. राज ठाकरे यांनी आपल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचाही समाचार घेतला.