अपघातग्रस्तांच्या मदतीला पालकमंत्री संभाजीराव निलंगेकर धावले
लातूर दि.१८ औसा तालूक्यातील चलबुर्गा पाठीजवळ बस आणि ट्रक चा अपघात झाल्याची चर्चा कानी पडताच जिल्हयाचे पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी घटनास्थळी धाव घेऊन अपघातग्रस्तांची मदत केली. संबंधित यंत्रणांना कामाला लावले. यामुळे गंभीर जखमींना तातडीने उपचार मिळण्यास मदत झाली. पालकमंत्री यांचे धाकटे बंधू अरविंद पाटील निलंगेकर हे देखील तात्काळ घटनास्थळी पोहोचले.
नियोजित कार्यक्रमानुसार पालकमंत्री संभाजी पाटील शनिवारी दुपारी औसा तालूक्यात होते. ३ वाजण्याच्या सुमारास चलबुर्गा पाटीजवळ बस आणि ट्रक चा अपघात झाला. या भयंकर अपघातात अनेकजण जखमी झाल्याची तसेच मृत्यू पडल्याची वार्ता पालकमंत्र्यांच्या कानी पडली हे ऐकताच ते तेथून तातडीने घटनास्थळाकडे रवाना झाले. घटनास्थळावरील चित्र पाहून पालकमंत्री ही सुन्न झाले. परंतू या प्रसंगात जखमीवर तातडीने उपचार व्हावेत यासाठी घटनास्थळावरुनच त्यांनी संबंधित यंत्रणांना निर्देश दिले. आरोग्य विभाग, रुग्णवाहिका, पोलिसयंत्रणा यांना सुचना करत जखमी रुग्णांना औसा आणि जवळच्या रुग्णालयात पोहचविण्याची व्यवस्था करुन दिली. खुद्द पालकमंत्री जातीने घटनास्थळावर हजर असल्याने जखमींना वेळेत उपचार मिळू शकले. यामुळे अनेक रुग्णांचे प्राण वाचू शकले. पालकमंत्री संभाजी पाटील घटनास्थळी पोहचण्यापूर्वीच त्यांचे धाकटे बंधू अरविद पाटील तेथे पोहोचले होते त्यांनीही पालकमंत्री तसेच अधिकार्यांनाही घटनेची माहिती देऊन मदत कार्याला वेग दिला.