मंत्रिमंडळ विस्ताराला अमित शहा यांचा हिरवा झेंडा!
मुख्यमंत्र्यांनी घेतली शहा यांची भेट
मुंबई दि.२१ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल रात्री उशीरा अहमदाबाद येथे भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांची भेट घेवून मंत्रिमडळ विस्ताराबाबत चर्चा केली, असल्याची माहिती सूत्रांकडून समजते.मंत्रिमंडळ विस्ताराला शहा यांनी या भेटीत हिरवा झेंडा दाखविल्याचे समजते.त्यामुळे पुढील आठवड्यात मंत्रिमंडळ विस्तार होण्याची दाट शक्यता आहे.
काल रात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अहमदाबाद येथे जावून भाजपचे राष्ट्रिय अध्यक्ष अमित शहा यांची भेट घेवून संभाव्य मंत्रिमंडळ विस्ताराबाबत या भेटीत चर्चा केल्याचे समजते.मंत्रिमंडळ विस्तारास शहा यांनी हिरवा झेंडा दाखविल्याचे समजते. हिवाळी अधिवेशन येत्या ११ डिसेंबरपासून सुरू होत आहे. त्यापूर्वी म्हणजे २८ नोव्हेंबरला मंत्रिमंडळ विस्तार करण्याचा मुख्यमंत्र्यांचा मानस आहे. मात्र या भेटीत तारीख निश्चित होऊ शकली नाही, असे समजते. माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या मंत्रिमंडळातील समावेशास भाजप अध्यक्ष अमित शहा हे अनुकूल आहेत तर; नारायण राणे यांनी काल सायंकाळी मुंबईत मुख्यमंत्र्यांची भेट घेतली, असेही सूत्रांनी सांगितले. पुढील आठवड्यात होणा-या मंत्रिमंडळ विस्तारात काहींना डच्चू दिला जाऊ शकतो. दोन कॅबिनेट मंत्र्यांना पुन्हा संधी मिळणार नाही, असेही समजते.