पोटनिवडणूक कोण लढवणार ? काॅग्रेस की राष्ट्रवादी !
दोन्ही काॅग्रेसच्या नेत्यांची बैठक सुरू
मुंबई दि.२१ येत्या ७ डिसेंबरला होणा-या विधानसभेच्या पोटनिवडणूकीच्या पार्श्वभूमीवर काॅग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक सुरू झाली असून,हि निवडणूक कोणी लढवावी त्याच बरोबर आगामी अधिवेशनावर या बैठकीत चर्चा सुरू आहे.
विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मंत्रालयासमोरील शासकीय निवासस्थानी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची बैठक सुरू असून, कांग्रेसकडून प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण, विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील, माणिकराव ठाकरे, शरद रणपिसे तर राष्ट्रवादीकडून अजित पवार, विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे, जयंत पाटील उपस्थित आहेत.