पोटनिवडणूकीसाठी दोन्ही काॅग्रेसच्या सहमतीने उमेदवार देणार

पोटनिवडणूकीसाठी दोन्ही काॅग्रेसच्या सहमतीने उमेदवार देणार

खा. अशोक चव्हाण यांची माहिती

मुंबई दि. २१ विधानपरिषदेच्या रिक्त झालेल्या एका जागेसाठी येत्या ७ डिसेंबरला पोटनिवडणूक होत आहे.या निवडणुकीसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्रितपणे उमेदवार देणार आहे. भाजपने कोणाला उमेदवारी द्यावी, हा त्यांचा प्रश्न आहे. त्यांनी नारायण राणे यांना उमेदवारी दिली किंवा नाही दिली तरी आम्ही सहमतीने उमेदवार देऊन त्याच्या विजयासाठी प्रयत्न करु, असा निर्धार काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी व्यक्त केला.

नारायण राणे यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी भाजप पुरस्कृत उमेदवार म्हणून राणे यांना उमेदवारी मिळण्याच्या शक्यतेने राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस नेत्यांची आज विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या  निवासस्थानी बैठक पार पडली त्यानंतर खा. चव्हाण बोलत होते. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची २७ नोव्हेंबर ही शेवटची तारीख आहे, तोपर्यंत आमचा सहमतीचा उमेदवार जाहीर करू,असेही त्यांनी स्पष्ट केले. आज झालेल्या बैठकीला विधानसभेचे विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील, खा.अशोक चव्हाण, माणिकराव ठाकरे, शरद रणपिसे तर राष्ट्रवादीचे नेते अजित पवार, विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे,आ. सुनिल तटकरे, जयंत पाटील उपस्थित होते.

Previous articleअण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या नवीन कर्ज योजनांचा शासन निर्णय जारी 
Next articleबी.टी.कापसावरील बोंडअळीमुळे झालेल्या नुकसानीबद्दल हेक्टरी २५ हजार रुपये भरपाई द्या

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here