मुख्यमंत्री आणि अजित पवारांचा ‘एकत्रित विमान’ प्रवास

मुख्यमंत्री आणि अजित पवारांचा ‘एकत्रित विमान’ प्रवास

औरंगाबाद दि.२२  राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विवाह सोहळ्यासाठी एकाच विमानातून प्रवास केला. लग्न सोहळ्याला हजेरी लावण्यासाठी हे दोन्ही नेते एकाच विमानातून आले होते.

राष्ट्रवादीचे आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगावकर यांच्या मुलाचा आणि शिवसेनेचे आमदार आणि सध्या भाजपच्या संपर्कात असलेले प्रताप पाटील चिखलीकर यांच्या भाचीचा विवाह सोहळा औरंगाबाद मध्ये काल सायंकाळी ७ च्या सुमारास संपन्न झाला.

माजी उपमुख्यमंत्री अजित पवार हे काही कामानिमित्त काल मंत्रालयात आले होते.त्यावेळी त्यांनी मुख्यमंत्री याची भेट घेतली होती.काल रात्री मुख्यमंत्री मुंबईहून आपल्या खास विमानाने औरंगाबादकडे रवाना झाले त्यावेळी त्यांच्या सोबत राष्ट्रवादीचे नेते अजित पवार होते. येथिल विमानतळावर उतरल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस आणि पवार हे एकाच गाडीने लग्नसोहळ्यात पोहोचले. मुखमंत्र्यांचा हा दौरा कमालीचा गुप्ततेचा होता. या विमान प्रवासादरम्यान दोन्ही नेत्यांमध्ये नेमकी काय चर्चा झाली, हे गुलदस्त्यामध्येच आहे.यापुढे आमच्या पक्षातील कोणत्याही नेत्याच्या कार्यक्रमाला मुख्यमंत्र्यांना आमंत्रित करणार नाही, असे पवार यांनी स्पष्ट केले होते तर; ७ डिसेंबरला होणारी विधानपरिषदेची पोटनिवडणूक या पार्श्वभूमीवर या दोन नेत्यांच्या एकत्रित विमान प्रवासाला कमालीचे महत्व प्राप्त झाले आहे.

Previous articleसांप्रदायिकतेविरुद्ध संघटनाची गरज
Next articleमाजी आ.रमेश कदम यांचा समर्थकांसह काँग्रेस पक्षात प्रवेश

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here