शरद पवार आम्हाला बाळासाहेबांच्या जागी
बाळा नांदगावकर
पुणे दि.२६ शरद पवार आम्हाला बाळासाहेबांच्या जागी असून, त्यांच्या बद्दल प्रचंड आदर आहे. परंतु शरद पवार यांचे बोट धरून अनेक जण राजकारणात आले. अगदी गुजरातचे लोक सुध्दा आले आणि देशाचे पंतप्रधान झाले. असे वक्तव्य मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी केले.
सध्या निष्ठावान कोणाला म्हणावे हे कळण्यात नाही. आमचे कुठे ही सरकार नसल्याने काही काम नाही, पण सध्या फेरिवाल्याचा मुद्दा मिळाल्याने आमचे काम लय भारी झाले आहे. परंतु सध्या काही पक्षात वेगळ्याच फेरीवाल्याचा विषय असतो, अशी फटकेबाजी नांदगावकर यांनी केली. माजी खासदार अशोक मोहोळ यांच्या अमृत महोत्सवानिमित्त महाळुंगे बालेवाडी येथील छत्रपती शिवाजी स्टेडियम येथे विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी नांदगावकर बोलत होते. शरद पवार हे आम्हाला बाळासाहेबांच्या जागी असून, त्यांच्या बद्दल आदर आहे. परंतु पवार साहेबांचे बोट धरून अनेकजण राजकारणात आले. अगदी गुजरातचे लोकपण आले आणि देशाचे पंतप्रधान झाले. पण पवारसाहेब तुम्हाला एक पी मिळाला दुसरा पी कधी मिळणार असा सवाल त्यांनी केला.