धक्कादायक…जिल्हाधिका-यांसह, विविध विभागांचेही चेक बाऊन्स !

धक्कादायक…जिल्हाधिका-यांसह, विविध विभागांचेही चेक बाऊन्स !

चेक बाऊन्स मध्ये शासनांच्या वतीने विभागांचा समावेश

मुंबई : मुख्यमंत्री सहाय्यता निधीला दिलेले १५१ चेक बाऊन्स झाल्याचे उघड झाले असतानाच यामध्ये जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त, विविध प्राधिकरण, विभागांचे अधिकारी यांनी दिलेले चेक बाऊन्स झाल्याची माहिती समोर आली आहे.या अधिका-यांनी दिलेले चेक खात्यात पुरेसे पैसे नसलेल्याने आणि बंद असेलेल्या खात्याचे असल्याने परत गेल्याची माहिती, माहिती अधिकार कार्यकर्ते जितेंद्र घाडगे यांना मिळाली आहे.

मुख्यमंत्री सहाय्यता निधीला दिलेले चेक बाऊन्स झालेल्यामध्ये सांगली जिल्हाधिकारी , अमरावती जिल्हाधिकारी ,धर्मादाय आयुक्त मुंबई, दक्षता व गुण नियंत्रण मंडळ, महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरण, सहायक लेखा अधिकारी, सहाय्यक कामगार आयुक्त, राज्य कर सहआयुक्त अन्वेषण, पोलीस आयुक्त यांचा समावेश असल्याचे माहिती अधिकारात उघड झाले आहे. विविध सामाजिक संस्था, राजकारणी, शैक्षणिक संस्था आणि राजकारण्यांनी दिलेले या सहाय्यता निधीला दिलेले चेक खात्यात पुरेशी रक्कम नसल्याने , सही नसल्याकारणाने परत गेल्याचे स्पष्ट झाले आहे.

राजकारणी, विविध संस्था यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीला दिलेले लाखो रूपयांचे धनादेश वटले नसल्याची बाब माहिती अधिकार कार्यकर्ते जितेंद्र घाडगे यांना माहिती अधिकारात मिळालेल्या माहितीत उघड झाल्याने मुख्यमंत्र्यांसोबत केवळ फोटोमध्ये झळकण्यासाठीच हा खटाटोप केला असल्याचे स्पष्ट झाले आहे.विशेष म्हणजे सरकारच्याच विविध खात्यांच्या अधिका-यांचेच धनादेश वटले नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

Previous articleसरकार राज्य चालविण्यास अपयशी ठरल्याचे द्योतक
Next articleकांताबेन रसिकलाल ट्रस्टचे ५१ लाख मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये जमा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here