मनसेला ‘हॉकर्स भूषण’ पुरस्कार द्यायला पाहिजे

मनसेला ‘हॉकर्स भूषण’ पुरस्कार द्यायला पाहिजे

रामदास आठवले यांचा मनसेला टोला

कल्याण:   मनसेने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘भय्याभूषण’ पुरस्कार देण्याची मागणी केली तर मनसेला ‘हॉकर्स भूषण’ पुरस्कार द्यायला पाहिजे असा टोला केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी लगावला आहे.कल्याणजवळच्या आंबिवली येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर राज्यस्तरीय साहित्य संमेलन झाले. त्यावेळी आठवले बोलत होते.

उत्तर भारतीय आणि इतर राज्यातून येणारे लोक मुंबईला महान बनवतात, त्यांनी मुंबईचा गौरव वाढवला असे वक्तव्य मुख्यमंत्र्यांनी केले होते. त्यावर मनसेने टीकास्त्र सोडत मुख्यमंत्र्यांना ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार मिळू शकत नाही, पण ‘भय्याभूषण’ पुरस्कार मिळावा, अशा शब्दात मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली होती.

मुंबईच्या जडणघडणीत मराठी माणसाचा वाटा आहेच, पण त्याचवेळी इतर राज्यातुन आलेल्या लोकांचे मुंबई वाढवण्यातले योगदानही महत्त्वाचेच आहे, असे रामदास आठवले यांनी सांगितले.शिवसेनेचाही उत्तर भारतीय संघ आहे, त्यामुळे राज ठाकरे यांनी जरा सामंजस्याने घ्यावे, असा सबुरीचा सल्ला आठवले यांनी दिला. राहुल गांधी मंदिरात जातात, त्यात काही चुकीचे नाही. पण यामुळे त्यांना आता भाजपा जातीयवादी असल्याची टीका करण्याचा अधिकार राहिला नसल्याचे आठवले म्हणाले. गुजरातमध्ये भाजपचीच सत्ता येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Previous article“इट का जवाब पथ्थर से मिलेगा”
Next articleन्याय न देणाऱ्या सरकारला बाहेरचा रस्ता दाखवणार 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here